Weather Update : राज्यात पावसाला पोषक वातावरण; ‘या’ जिल्ह्यांना आयएमडीचा अलर्ट!

0
2
Weather Update Today 7 Feb 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात भुवनेश्वर ते विशाखापट्टणपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Weather Update) निर्माण झाली आहे. हे चक्राकार आर्द्रतायुक्त वारे आंध्रप्रदेशहून विदर्भातील काही जिल्ह्यांपर्यंत प्रवास करत आहेत. त्यामुळे राज्यात चालू आठवड्याच्या शेवटी पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस (Weather Update) होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा (Weather Update Today 7 Feb 2024)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, (Weather Update) राज्यात प्रामुख्याने शनिवार व रविवार या दोन दिवशी परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा या भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. या जिल्ह्यांच्या भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण राहू शकते. तर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची होऊ शकतो. या कालावधीत मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र, आकाश निरभ्रच राहून राहण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार

हवामान विभागाच्या माहितीनुसार, “एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीर आणि पंजाबवरून पूर्वेकडे येत आहे. तो जसा जसा उत्तर-मध्य भारतावरून पुढे येत आहे. तस तसे उत्त्तरेकडील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण कमी होत आहे. हा पश्चिमी विक्षोभ मध्य प्रदेश, ओडिसा, आंध्रप्रदेश, उत्तर-मध्य कर्नाटक ते महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागापर्यंत गोलाकार प्रवास करणार आहे. ही चक्रीय स्थिती पुढील काही दिवस सक्रिय राहणार आहे. ज्यामुळे देशातील पूर्वेकडील भुवनेश्वर ते विशाखापट्टणम भाग ते मध्य भारताच्या पट्ट्यात काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे.”

आज उत्तर भारतातील पावसाचे वातावरण काहीसे निवळले असून, त्या ठिकाणी जम्मू-काश्मीरच्या काही निवडक भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मात्र, थंडीत अल्प वाढ होऊन, पुन्हा पुढील आठवड्यात उत्तर भारतातील काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. असा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.