Weather Update: राज्यात तापमानातील चढ-उतार कायम; उन्हाचा चटका आणि गारठा दोन्हींचा अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये चटका आणि गारठा (Weather Update) असे दोन्ही प्रकार सध्या अनुभवायला मिळत आहेत. रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा तर दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवतो आहे. दरम्यान मागच्या २४ तासात राज्यात किमान १२ तर कमाल ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान स्थिती ?

नैॡत्य बंगालच्या उपसागर आणि लगतच्या विषुववृत्तीय समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत (ता. १०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली शुक्रवारपर्यंत (ता. ११) तमिळनाडू, पद्दूचेरीकडे येण्याचे संकेत आहेत. या प्रणालीपासून आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा (Weather Update) पट्टा सक्रिय आहे.

राज्यात थंडीची चाहूल लागली असली, तरी अद्याप कडाक्याच्या (Weather Update) थंडीची प्रतीक्षा आहे. राज्यात पहाटे गारठा, धुके आणि दव पडत होते. तर अंशतः ढगाळ हवामान असले तरी दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात किमान तापमान १२ ते २१ अंशांच्या दरम्यान, तर कमाल तापमान ३१ ते ३६ अंशांच्या आसपास होते.

राज्यात किती तापमान ?(Weather Update)

मंगळवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२.१ (१३.६),
नगर – (१५.५)
जळगाव ३५.२ (१६)
धुळे ३४ (१२.२)
कोल्हापूर ३२.१ (१८.६)
महाबळेश्‍वर २७.७ (१५.६)
नाशिक ३२.२ (१३.२)
निफाड ३१.८ (१२)
सांगली ३३.२(१७.१)
सातारा ३१.९(१५.०)
सोलापूर ३४.४ (१९.५)
सांताक्रूझ ३४.८ (२१.४)
डहाणू ३१.८ (१९.६)
रत्नागिरी ३५.६ (२१)
औरंगाबाद ३१.७ (१५)
नांदेड ३१.८ (१७.६)
उस्मानाबाद ३२ (१३.८)
परभणी ३२.९ (१६.६)
अकोला ३५.१ (१९.०)
अमरावती ३४ (१५.७)
बुलडाणा ३१.६ (१८.५)
ब्रह्मपुरी ३३.६ (१७.३)
चंद्रपूर ३२ (२०.२)
गडचिरोली ३२.२ (१६.४)
गोंदिया ३२.५(१५.२)
नागपूर ३३ (१५.२)
वर्धा ३२.६ (१६.४)
वाशीम ३४.२ (१६.५)
यवतमाळ ३४.५ (१४.५).

 

 

error: Content is protected !!