Weather Update : अलर्ट …! राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र पावसाने (Weather Update) जोर धरला आहे. कोकण मध्यमहाराष्ट्रसह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. इथूनपुढे देखील आजपासून (ता. ९) राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून, ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालचा उपसागर ते उत्तर अंदमान समुद्रापर्यंत विस्तारला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. राज्याच्या दक्षिण भागात पूर्व-पश्चिम (Weather Update) वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे. उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेल्या ठळक कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. आज (ता. ९) अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार होऊन ते ओडिशा आणि छत्तीसगड राज्यात जमीनीवर येण्याची शक्यता आहे.

अलर्ट जारी

आज (ता. ९) कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यासह नाशिक, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Weather Update) रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी, जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर, जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर, मराठवाड्यातील नांदेड तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!