हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे राज्यासह देशभरात सध्या नागरिक उष्णतेच्या लाटेने हैराण (Weather Update) झाले आहे. तर पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. काही भागात गारपीटही झाली आहे. अशातच आता महाराष्ट्रात पुढील चार दिवस जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. यामध्ये आज प्रामुख्याने विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची (Weather Update) हजेरी पाहायला मिळणार आहे. असे आयएमडीने म्हटले आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार (Weather Update Today 9 May 2024)
हवामान विभागाच्याअंदाजानुसार, राज्यात प्रामुख्याने विदर्भासह मराठवाड्यात 13 मेपर्यंत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. यात अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय लातूर, आणि हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर उर्वरित राज्यात सर्वच ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
उकाड्यातील वाढ कायम
दरम्यान, मागील 24 तासांमध्ये राज्यातील अकोला या ठिकाणी उच्चांकी 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर, वर्धा येथे 44 अंश, गडचिरोली, परभणी, अमरावती, वाशीम आणि नागपूर येथे 43 अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय कोकणात देखील उकाडा वाढला असून, मुंबईसह कोकण विभाग उष्णतेच्या लाटेत होरपळत असताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईसह कोकण पट्ट्यात पुढील चार दिवसात उन्हाच्या तडाखा आणखी वाढणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
पूर्वेकडील राज्यातही पाऊस
याशिवाय सध्या महाराष्ट्रासोबतच देशाच्या पूर्व भागात देखील पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने बिहार, पूर्व उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांसह ईशानेकडील सर्वच राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे यंदाचा संपूर्ण हिवाळा आणि उन्हाळाही अवकाळी पाऊस पाठ सोडताना दिसत नाहीये.