Weather Update : या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशातून नैऋत्य मान्सून (मोसमी वारे) परतला आहे. राज्यात तापमानात चढउतार (Weather Update) पहायला असून राज्यात (आज दि. 17) कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

काही भागात जोरदार पावसाची शक्यता (Weather Update)

राज्यात आज (दि. 17) सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा (यलो अलर्ट) तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा (यलो अलर्ट) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

error: Content is protected !!