आता बटाटे जमिनीवर नाही तर हवेत बटाटे पिकणार कृषी शास्त्रज्ञांचा नवीन शोध शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार

शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने  केंद्रीय बटाटा संशोधन संस्था, शिमला यांच्याशी करार केला आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या या संस्थेने  हवेत बटाटा बियाणे उत्पादनाचे हे अनोखे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

ICAR अंतर्गत केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या विषाणू रोगमुक्त बटाटा बियाणे उत्पादनाच्या एरोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे देशातील अनेक भागांतील शेतकर्‍यांना बटाट्याची उपलब्धता झाली आहे.

नवीन तंत्रज्ञानामुळे बटाटा बियाणांची गरज लक्षणीयरित्या पूर्ण होईल.  त्यामुळे देशातील बटाट्याचे उत्पादन वाढणार आहे.

बटाटा हे जगातील सर्वात महत्वाचे बिगर तृणधान्य पीक आहे,  ज्याची जागतिक अन्न व्यवस्थेत महत्वाची भूमिका आहे.

एरोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे, मिस्टिंगच्या स्वरूपात पोषक तत्वांची मुळांमध्ये फवारणी केली जाते. वनस्पतीचा वरचा भाग खुल्या हवेत आणि प्रकाशात राहतो. एका रोपातून सरासरी 35-60 मिनीकँड्स (3-10 ग्रॅम) मिळतात. मातीचा वापर न केल्यास, मातीचे रोग होत नाहीत आणि पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत एरोपोनिक पद्धतीमुळे प्रजनन बियाण्याच्या विकासात दोन वर्षांची बचत होते. या तंत्रज्ञानाचे 8 राज्यांमधील 20 कंपन्यांसह बटाटा बियाणे उपलब्धतेसाठी व्यावसायिकीकरण करण्यात आले आहे.