वावरातील रब्बी पिकांना कोणती खत मात्रा द्याल ? तुरीचे कसे कराल व्यवस्थापन? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात सध्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर मका पिकसह इतर रब्बी पिकांना सध्या कोणती खाते द्यावीत ? याबाबतची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिली आहे जाणून घेऊया…

पीक व्यवस्थापन

१) कापूस : वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या झाडावर 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा.

२) तूर : तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

३) रब्बी भुईमूग : रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या आणि एक खुरपणी करावी.

४) मका : वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. रब्बी मका पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी. पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पेरणी करतांना 75 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि 75 किलो नत्र पेरणीनंतर एक महीण्यांनी द्यावे, याकरिता 289 किलो 10:26:26 + युरिया 100 किलो किंवा 500 किलो 15:15:15 किंवा 375 किलो 20:20:00:13 किंवा युरिया 163 किलो + 469 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 126 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी आणि 163 किलो युरिया प्रति हेक्टर पेरणीनंतर एक महीण्यांनी द्यावा. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

५) रब्बी ज्वारी: पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी मात्रा 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी द्यावा. वेळेवर पेरणी केलेल्या

६) रब्बी सूर्यफुल: पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी.

७) गहू : वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. गव्हाची पेरणी करतांना 154 किलो 10:26:26 + युरिया 54 किलो किंवा 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 53 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ‍किंवा 87 किलो युरिया + सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. राहिलेले अर्धे नत्र 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे.

error: Content is protected !!