Wheat Cultivation : गहू निर्यातीबाबत सरकार घेणार मोठा निर्णय; शेतकऱ्यांचा फायदा कि तोटा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गहू हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत अन पश्चिमेपासून ते पूर्व भारतापर्यंत सर्वत्र भारताचा कमी अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आता गहू निर्यातीबाबत केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सरकारच्या या निर्णयायचा शेतकऱ्याला फायदा होणार कि तोटा याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो मे २०२२ रोजी केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. गव्हाच्या किंमती वाढल्याने सरकारने किंमती नियंत्रित करण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र आता गव्हाचा नवा हंगाम सुरु झाला आहे. यापार्श्वभूमीवर गव्हावरील बंदी हटवण्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शेतीमधील खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी हे काम कराच –

शेतकरी मित्रांनो नवनवीन तंत्रज्ञान, नवी माहिती याबाबत योग्य वेळी अचूक माहिती मिळवून हायटेक शेतीतून खर्च कमी करून आपले उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक उपकरण सांगणार आहोत. Hello Krushi या मोबाईल अँपचा वापर करून आज हजारो शेतकरी शेतीनिगडीत सर्व सेवा एकाच अँपवर मिळवत आहेत. सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, बाजारभाव, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री यश अजून बऱ्याच उपयोगी सुविधा या अँप वर आहेत. याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला १ रुपयाही भरावा लागत नाही. तेव्हा वाट न पाहता गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi आजच डाउनलोड करा.

केंद्र सरकारने गव्हावरील बंदी हटवली तर याचा शेतकरी अन व्यापारी या दोघांनाही फायदा होणार आहे. केंद्र सरकारने बंदी हटवण्याच्या तयारीला सुरवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रात चर्चा सुरु आहे. गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याच्या मागणीवर सरकार मार्च-एप्रिलच्या आसपास निर्णय घेईल अशी माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाचे (डीजीएफटी) महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी दिली आहे

जगभरात सध्या गव्हाची कमतरता जाणवत आहे. २०२२ मधील हवामान बदलाचा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होऊन गव्हाचे उत्पादन घटले होते. परिणामी बाजारात गव्हाची आवक कमी अन मागणी जास्त झाल्याने दर वाढले होते. मात्र यंदा केंद्र सरकार गव्हावरील बंदी हटवण्याचा विचार करत आहे.

केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर धान्य विदेशात निर्यात करते. भारत जगातील अनेक देशांमध्ये गहू, तांदूळ, चहा, साखर निर्यात करतो. अनेक देश भारताकडून अन्नधान्याची मागणी करतात. गव्हाची निर्यात बंदी हटवल्यास याचा थेट शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गहू उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा चांगला भाव मिळण्याची यामुळे शक्यता आहे.

error: Content is protected !!