Wheat Procurement : देशात यंदा विक्रमी गहू खरेदी, 22 लाख शेतकऱ्यांना फायदा, वाचा…आकडेवारी?

0
4
Wheat Procurement In India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी देशात मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी (Wheat Procurement) केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार आत्तापर्यंत विक्रमी गव्हाची खरेदी झाली आहे. गहू खरेदीने मागील वर्षीचा विक्रम मोडला आहे. आत्तापर्यंत सरकारने 262.48 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली आहे. गहू खरेदीमुळे (Wheat Procurement) 22.31 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. तर 59,715 कोटी रुपये किमान आधारभूत किंमतीच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

आतापर्यंत 262.48 लाख टन खरेदी (Wheat Procurement In India)

रब्बी विपणन हंगाम 2024-25 दरम्यान गव्हाची खरेदी (Wheat Procurement) देशभरातील प्रमुख खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये सुरळीतपणे सुरू आहे. या वर्षात आतापर्यंत 262.48 लाख टन गहू खरेदी करण्यात आला आहे. केंद्रीय साठ्यात गेल्या वर्षी झालेल्या एकूण 262.02 लाख मेट्रिक टन खरेदीला मागे टाकत यावर्षी गव्हाची खरेदी झाली आहे. रब्बी विपणन हंगाम 2024-25 मध्ये एकूण 22.31 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असून 59,715 कोटी रुपये किमान आधारभूत किंमतीच्या स्वरूपात प्रदान करण्यात आले आहेत.

पाच राज्यांचे सर्वाधिक योगदान

गहू खरेदीमध्ये प्रमुख योगदान पाच राज्यांचे आहे. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी अनुक्रमे 124.26 लाख मेट्रिक टन, 71.49 लाख मेट्रिक टन, 47.78 लाख मेट्रिक टन, 9.66 लाख मेट्रिक टन आणि 9.07 लाख मेट्रिक टन गहू खरेदी केला आहे. पंजाब आणि हरियाणा ही दोन राज्य गहू खरेदीत आघाडीर असणारी राज्य आहेत. दरवर्षी या दोन राज्यातून मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी होत असते. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा मिळतो.

तांदळाचीही मोठ्या प्रमाणात खरेदी

सध्या धान खरेदीही सुरळीत सुरु आहे. खरिप विपणन हंगाम 2023-24 दरम्यान 489.15 लाख मेट्रिक टन तांदुळाच्या समतुल्य 728.42 लाख मेट्रिक टन धान आतापर्यंत 98.26 लाख शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्यात आले आहे. 1,60,472 कोटी रुपये किमान आधारभूत किंमतीच्या रुपात प्रदान करण्यात आले आहे. उपरोक्त निर्देशित खरेदी केल्यामुळे, केंद्रीय साठ्यामध्ये सध्या गहू आणि तांदूळ यांचा एकत्रित साठा 600 लाख मेट्रिक टनाच्या पुढे गेला आहे.