गव्हाच्या लागवडीसाठी कोणत्या जातींची निवड कराल ? कधी कराल पेरणी ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू एक महत्त्वपूर्ण रबी धान्य आहे, ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास 3 टक्के भागीदारी आहे. देशात गव्हाच्या अनेक जातींची लागवड केली जाते.

जमीन

गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा.
पेरणीची वेळ – जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी.

पेरणी

-पेरणी दोन ओळीतील अंतर २२.५ ते २३.० सें.मी. ठेवून करावी. बी ५ ते ६ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नका.
-उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी.
-म्हणजे पेरणीबरोबरचा रासायनिक खताचा पहिला हप्ता देता येईल.
-जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ३.० मीटर रूंदीचे सारे पाडावेत व आडव्या दिशेने पाट पाडावेत.

बियाणे

– गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे.
– यासाठी नोव्हेंबरमध्ये पेरताना हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे.
– उशीरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे आणि पेरणी १८ सें.मी. अंतरावर करावी.
– जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे व २२.५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी

अ.क्र.

जात

फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)

परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)

१००० दाण्याचे वजन (ग्रँम)

दाण्याचा रंग

प्रती हेक्टरी उत्पादन

अ) कोरडवाहू
१. एन ५९

५५-६०

११५-१२०

४०-५४

पिवळसर

८-१०

२. एमएसीएस १९६७

५५-६०

१०५-११०

४२-४५

पिवळसर

८-१०

३. एन आय ४५३९

५५-६०

१०५-११०

३५-३८

पिवळसर

१०-१२

४. एकेडीडब्लू २९९७-१६(शरद)

५०-६०

११०-११५

४५-५५

पिवळसर

१२-१४

ब) बागायती वेळेवर पेरणी
१. एचडी २३८०

५५-६०

१०५-११०

३८-४०

पिवळसर

३०-३५

२. एमएसीएस २४९६

६०-६५

११०-११५

३८-४०

पिवळसर

३०-३५

३. एचडी २१८९

६०-६५

११०-११५

४०-४२

पिवळसर

३०-३५

४. पूर्णा (एकेडब्लू १०७९)

६५-७०

११०-११५

४०-४२

पिवळसर

३०-३५

५. एमएसीएस२८४६

६५-७०

११०-११५

४५-५०

पिवळसर

३०-३५

६.. एकेएडब्ल्यू ३७२२ (विमल)

५०-६०

१०५-११५

४०-४२

पिवळसर

३०-३५

क) बागायती उशिरा पेरणी
१. एकेडब्ल्यू ३८१

५५-६०

९०-९५

४४-४६

२५-३०

२. एच आय ९९९

५५-६०

१००-१०५

४०-४२

२५-३०

३. एचडी २५०१

५५-६०

१०५-११०

४०-४२

२५-३०

४. पूर्णा (एकेडब्ल्यू १०७१)

५५-६०

१००-१०५

४०-४२

२५-३०

५. एनआयएडब्ल्यू ३४

५५-६०

१००-१०५

४०-४२

२५-३०

टिप: गव्हाच्या कल्याण सोना, सोनालीका आणि लोकवन या जाती तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे त्याची लागवड करु नये

 

error: Content is protected !!