हॅलो कृषी ऑनलाईन: पिकासाठी सर्वात हानिकारक किडीपैकी एक म्हणजे हूमणी (White Grub) कीड. या किडीचा प्रादुर्भाव जवळपास सर्वच पिकांवर आढळून येतो. तसेच वेगवेगळ्या अवस्थेत ही कीड आढळून येत असल्यामुळे जवळपास वर्षभर या किडीमुळे होणारे नुकसान सहन करावे लागते. हूमणी किडीच्या (Humani Kid) नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धती (IPM) जास्त फायदेशीर ठरते, आणि यामध्ये जैविक पद्धतीचा (Biological Control Method) महत्त्वाचा वाटा असतो.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (MPKV Rahuri) अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे (Agriculture College Pune) येथील चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी (Student) सृष्टी संदीप शितोळे आणि तिच्या सहकारी विद्यार्थ्यांनी हूमणी कीड (White Grub) जैविक नियंत्रणासाठी मेटाऱ्हाझियमची (Metarhizium Insecticide) निर्मिती केली आहे.
या मेटाऱ्हाझियमचा (Metarhizium) वापर प्रामुख्याने हूमणी अळी, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे इत्यादी किडींच्या नियंत्रणासाठी केला जातो. ऊस, भात, भुईमुग, मका, बाजरी इत्यादी खरीप हंगामातील पिकांचे (Kharif Crop Pests) मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या हूमणी अळीच्या (White Grub) नियंत्रणासाठी तसेच फळबागांमध्ये व पाळेभाज्यांसाठीही या मेटाऱ्हाझियमचा वापर करता येतो.
हूमणी अळीच्या (White Grub) नियंत्रणासाठी वापरले जाणारे मेटाऱ्हाझियमची हे बुरशीयुक्त जैविक कीटकनाशक आहे. ते हूमणी अळीच्या शरीरात प्रवेश करून उपजीविका करते. त्याच्या संपर्कात आलेली अळी साधारणतः 10-15 दिवसांत मरते. सृष्टीसह सायली भोये, आदित्य संतोष ताकवणे, संकेत कदम, पद्माकर जठार आदी विद्यार्थ्यांनी मदत केली.
हे मेटाऱ्हाझियम आतापर्यंत नारायणगाव केव्हीके, भुईज कारखाना, सातारा, दौंड, शिरूर, आळंदी अशा विविध ठिकाणी पाठविले आहे.
मेटाऱ्हाझियम बुरशी वापरताना काय दक्षता घ्यावी?
- फवारणीपूर्वी व नंतर 1 आठवडा रासायनिक बुरशीनाशक टाळावे.
- कोरड्या हवामानात पिकास भरपूर पाणी द्यावे. तसेच फवारणीनंतर चांगल्या नियंत्रणासाठी दोन दिवस तिसर्या प्रहरी पाणी द्यावे.
- मेटाऱ्हाझियमची बॅग थंड जागेत साठवावी.
- बोर्डो मिश्रण, कॉपर ऑक्सिक्लोराइड व इतर रासायनिक बुरशीनाशके वापरू नयेत.
वापरण्याची पद्धत
प्रति एकरी ऊस पिकासाठी 8 किलो ‘फुले मेटाऱ्हाझियम’ (Phule Metarhizium) शेणखतात मिसळून पिकास द्यावे. प्रति लिटर पाण्यात 5 ग्रॅम ‘फुले मेटाऱ्हाझियम मिसळून शेत वापश्यावर असताना उसाच्या खोडात आळवणी करावी. 1000 ग्रॅम ‘फुले मेटाऱ्हाझियम’ 200 लिटर पाण्यात मिसळून साध्या किंवा एच. पी. टी. पंपाने फवारावे.
मेटाऱ्हाझियमचे फायदे
निर्यातक्षम फळे व भाजीपाला यावर विषारी कीटकनाशके यांचे अवशेष व दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त.