Wild Animals : जंगली प्राणी पिकांचे नुकसान करताय? शेतात लावा ‘झटका मशीन’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जंगली प्राण्यांमुळे (Wild Animals) शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. नीलगाय, रानडुक्कर आणि हरीण यांसारखे प्राणी खातात कमी मात्र शेतकऱ्यांचे पीक पूर्ण तुडवून टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक पूर्णपणे वाया जाते. मात्र आता शेतकऱ्यांच्या मदतीला एक मशीन बाजारात उपलब्ध आहे. ज्याचा वापर करून फळ उत्पादक शेतकरी किंवा अन्य शेतकरीही कायमस्वरूपी जंगली प्राण्यांच्या (Wild Animals) त्रासापासून सुटका मिळवू शकतात. या मशीनचे नाव ‘झटका मशीन’ आहे. या मशीनबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत…

काय आहे झटका मशीन? (Wild Animals Damaging Crops)

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या जंगली प्राण्यांचा (Wild Animals) बंदोबस्त करण्यासाठी ही मशीन बनवण्यात आली आहे. ही मशीन 12 वोल्ट बॅटरी आणि सौर ऊर्जा या दोन्हीच्या माध्यमातून कार्यान्वित होते. जर तुम्हाला दिवसा झटका मशीनचा करायचा असल्यास तुम्ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून या मशीनचा वापर करू शकतात. तर रात्रीच्या वेळी या मशीनचा वापर करायचा असल्यास तुम्ही बॅटरी चार्ज करून वापरू शकतात.

कसा करतात वापर?

झटका मशीनचा वापर करण्यासाठी तुम्हाला या मशीनच्या तारांचा वापर शेताच्या चारही बाजूने करावा लागतो. या तारांना मशीनच्या माध्यमातून करंट दिला जातो. कोणत्याही जंगली प्राण्याचा या तारांना स्पर्श झाल्यास, त्याला याचा जबरदस्त करंट बसून तो प्राणी तुमच्या शेतातून पळून जातो. त्यामुळे अनेक शेतकरी या मशीनला ‘करंट मशीन’ या नावाने देखील ओळखतात. ही मशीन पशुक्रूरता नियमांचा भंग करणारी नसावी. या मशीनचा वापर पूर्ण माहिती घेऊनच करावा. जंगली प्राण्यांचा खूपच धुडघूस असेल तरच या मशीनचा वापर सरकारी पातळीवरून परवानगी घेऊनच करावा.

‘ही’ आहेत वैशिष्ट्ये

या झटका मशीनमध्ये एक ध्वनी चेतावणी यंत्र बसवण्यात आले आहे. ज्याला आपण सायरन किंवा भोंगा देखील म्हणतो. एखादा जंगली प्राणी तुमच्या शेताच्या जवळ आल्यास, किंवा या प्राण्याने मशीनच्या तारीला स्पर्श केल्यास हा सायरन मोठा आवाज करतो. ज्यामुळे प्राणी घाबरलेल्या अवस्थेत पळून जातो. विशेष म्हणजे ही झटका मशीन प्राण्याला झटका बसल्यानंतर काही सेकंदात करंट पास करणे थांबवते. ज्यामुळे प्राण्याची सुटका होऊन तो पळून जातो. परिणामी एखादा प्राणी दगावण्याची भीती या मशीनमुळे नसते.

किती आहे किंमत?

तुम्हालाही ही झटका मशीन खरेदी करायची असेल तर ती तुम्हाला बाजारात 3000 ते 5000 रुपयांच्या दरम्यान मिळून जाते. या खर्चामध्ये बॅटरी ही वेगळी घ्यावी लागते. एक झटका मशीन जवळपास 10 एकर शेती कव्हर करू शकते. या मशीनच्या किमतींचा विचार करता, वेगवेगळ्या कंपन्यांची किंमत ही वेगवेगळी असते. तुम्ही ही मशीन खात्री करून, ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात.

error: Content is protected !!