आता वन्य प्राणी पिकांचे नुकसान करू शकणार नाहीत, शेतकऱ्याने केला लय भारी ‘देशी जुगाड’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पूर-पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. तसेच पक्षी आणि जंगलातील प्राणी देखील शेतीचे मोठे नुकसान करतात. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील ढोणी गावातील शेतकरी गजानन शेळके यांनी त्यांच्या १ एकर शेतात ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. यावेळी चांगले पीक आले आहे. पण ही पिके रानडुक्कर आणि नील गाईंपासून वाचवणे फार कठीण आहे. स्वतःच्या पिकाची नासाडी होण्यापासून वाचवण्यासाठी आता एका शेतकऱ्याने आपल्याच डोक्यालिटीने नवीन प्रयोग केला आहे.

या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्रस्त शेतकरी गजानन यांनी घरात ठेवलेल्या स्टीलच्या 4 कळशा घेऊन चारही कळशीत खेळायच्या गोट्या टाकल्या . त्यानंतर चारही कलश बांबूच्या साहाय्याने शेताच्या चार दिशांना बांधून प्रत्येक कळशीला दोरीने जोडले. शेतकऱ्याने उन्हापासून वाचण्यासाठी शेताच्या मधोमध मचान बनवले आणि आता त्यात बसून जनावरांना आरामात पळवून लावतो. मचाणावर मध्येच बसून दोरी ओढली की चारही कळशा वाजू लागतात आणि प्राणी पळून जातात. शेतकऱ्याची ही पद्धत प्रभावी ठरली आहे. आता जनावरांना हाकलण्यासाठी उन्हातान्हात त्यांच्या मागे पळण्याऐवजी शेतकरी आरामात सावलीत बसून वन्य प्राण्यांना शेतातून हाकलून देतो आहे.

तासंतास एका जागी बसून राहू शकत नाही . रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा त्रास अधिक होतो त्यावरही या शेतकऱ्याने पर्याय काढला आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकऱ्याने नादुरुस्त कुलरचा पंखा घेतला, या पंख्याच्या पात्याला बेअरिंग बांधून त्याला स्टील प्लेट लावून बांबूच्या साहाय्याने उभे केले .जसजशी हवा येते तसा पंखा फिरतो त्यावर लावलेलं बेअरिंग स्टीलच्या प्लेटला लागते त्यामुळे आवाज येतो आणि वन्य जनावरे शेतापासून लांब पाळतात. वन्य प्राण्यांना पळवण्याचे शेतकऱ्याचे हे देशी जुगाड गावात कुतूहलाचा विषय बनले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!