हिरवी मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल वाढ ; भारतीय भाजी संशोधन संस्थेने विकसित केले भारी तंत्रज्ञान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आजपर्यंत तुम्ही लाल मिरची पावडर बाबत ऐकले असेल. किंबहुना लालमिरची पावडर शिवाय भारतीय अन्नपदार्थ बनतच नाहीत. लाल मिरची पावडरला मोठी मागणी असते. याचबरोबर लाल मिरची पावडर बनवण्यासाठी मोठी उलाढालही बाजारपेठांमध्ये होत असते. मात्र आता लवकरच ग्राहकांना हिरव्या मिरचीची पावडर देखील उपलब्ध होणार आहे. त्यानिमित्ताने हिरव्या मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आपल्याच शेतातील हिरव्या मीरचीची पूड शेतकरी स्वतः विकू शकतात किंवा ती कंपन्यांनाही विकत येणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मिरचीचा व्यापार करू शकतात.

हिरव्या मिरचीपासून पावडर बनवण्याचे तंत्रज्ञान
अलीकडेच, वाराणसीच्या भारतीय भाजी संशोधन संस्थेने (IIVR) हिरव्या मिरचीपासून पावडर तयार करण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान संस्थेने हिमाचल प्रदेशस्थित कंपनी होल्टन किंगच्या सहकार्याने विकसित केले आहे. ज्यामध्ये आता हिरव्या मिरचीपासून पावडर तयार केली जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. भारतीय भाजी संशोधन संस्थेचे संचालक म्हणतात की, या तंत्राद्वारे शेतकऱ्यांना हिरवी मिरची पावडर बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यासोबतच आता लाल मिरची पावडर सोबतच हिरवी मिरची पावडरही ग्राहकांना बाजारात उपलब्ध होणार आहे. हिरवी मिरची पावडर बनवण्याचे तंत्रज्ञान आयआयव्हीआरच्या नावाने पेटंट केलेले आहे.

व्हिटॅमिन सी युक्त असते हिरवी मिरची पावडर
दुसरीकडे, इंडियन व्हेजिटेबल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणतात की हिरव्या मिरचीपासून तयार केलेल्या पावडरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. त्यात 30 टक्क्यांहून अधिक व्हिटॅमिन सी आढळून येत असून, 94 ते 95 टक्के क्लोरोफिल आणि 65 ते 70 टक्के कॅप्सेसिन पोषक तत्त्वेही आढळून येत आहेत, त्यामुळे हिरवी मिरची पावडर दीर्घकाळ टिकवून ठेवता येते. ही हिरवी मिरची पावडर आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

शेतकऱ्यांकडून कंपन्या खरेदी करतील हिरवी मिरची
आता हिरवी मिरची पावडर बनवण्यासाठी कंपनी थेट शेतकऱ्यांकडून हिरवी मिरची खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्यांच्या पिकाची मागणीही वाढेल.

Leave a Comment

error: Content is protected !!