अवकाळीग्रस्त द्राक्ष उत्पादकांना वायनरीचा दिलासा; ‘या’ संस्थेद्वारे बनवली जाते वाईन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसाने राज्यात चांगलाच गोंधळ घातल्याने द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. यामुळे राज्यातील शेतकरी चांगलाच हवालदिल झाल्याचे पाहायला मिळालं मात्र आता शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. अवकाळीग्रस्त द्राक्ष उत्पादकांना वायनरीचा दिलासा मिळाला आहे. सांगलीतील ग्रेप्स सिटी वाईनरी सहकारी संस्था (Grapes City wineray) खराब झालेल्या द्राक्षापासून वाईन तयार करत आहे.

24 एप्रिल ते 2 मेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यापूर्वी सुद्धा आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे. अशातच आता तासगावाच्या ग्रेप सिटी वाईनरी सहकारी संस्था (Grapes City Wine) शेतकऱ्यांना जीवदान देतेय. अवकाळी पावसाळ्यात द्राक्ष खराब होतात. त्या द्राक्षावर प्रक्रिया करून त्याची वाईन (Wine) बनवली जाते. त्यामुळे या प्रक्रियेच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्हांला कृषी प्रक्रिया उद्योग किंवा पीक व्यवस्थापण याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच मोबाइल मध्ये हॅलो कृषी हे डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आणि अगदी 1 रुपया सुद्धा खर्च न करता शेतीविषयक संपूर्ण माहिती, कृषी सल्ले, कृषी प्रक्रिया उद्योग याबाबत माहीती मिळवू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

ग्रेप्स सिटी वाईनरी सहकारी संस्थेद्वारे इतर फळांपासून सुद्धा वाईन बनवली जाते

या संस्थेद्वारे खराब झालेल्या द्राक्षाच्या वाइन सोबतच मध, जांभूळ तसेच करवंद या फळापासून सुद्धा वाईन बनवली जाते. तसेच त्याबदल्यात शेतकऱ्यांना चांगला दरही दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होतोय. तसेच या फळांपासून बनवलेली वाईन ही आता काही राज्यात जाऊ लागली आहे.

error: Content is protected !!