मोठा व्यवसाय सोडून, सुरू केली लिंबाची शेती; आता कमावतो आहे वार्षिक 10 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | अनेक तरुणांनी शेतीला आपली पहिली पसंती बनविण्यास सुरुवात केली आहे. योग्य नियोजन, तंत्रशुद्ध शेती पद्धत आणि व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान असेल तर शेती फायदेशीर ठरू शकते, असे अनेक तरुणांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील संग्रामगड गावच्या अभिषेक जैन यानेही असेच एक उदाहरण समोर दिले आहे. अभिषेक यांनी लिंबाची सेंद्रिय शेती करून चांगले उत्पन्न त्या मधून ते मिळवत आहेत. जाणून घेऊन त्यांच्या लिंबू शेतीविषयी अधिक माहिती.

अभिषेक जैन हे कागदी लिंबाची लागवड करून त्याचे उत्पन्न उत्पादन घेतात. या लिंबाची त्वचा पातळ असून, याचा आकार मोठा असतो. व यातून मोठ्या प्रमाणात रस बाहेर पडतो. त्यामुळे, याला मागणीही जास्त असते. लिंबाचे झाड लावल्यानंतर तीन वर्षांनी त्याला फळे येऊ लागतात. तिसऱ्या वर्षी 25 ते 30 किलो, चवथ्या वर्षी 50 ते 55 किलो आणि पाचव्या वर्षी ऐंशी ते दीडशे किलो लिंबाचे उत्पादन ते घेतात.

अभिषेक यांचा मार्बलचा व्यवसाय होता. पण, वडिलांच्या निधनानंतर त्यांना शेती सांभाळण्यासाठी गावी यावे लागेल. त्यानंतर, त्यांनी शेतीमध्येच आपला जम बसवला. आता ते वार्षिक आठ ते दहा लाखाचा लाखाचे उत्पन्न त्यातून ते घेतात. त्यांनी अजून नवनवीन प्रयोग शेतीमध्ये राबवण्याचे ठरवून, त्यानुसार वाटचालही सुरु केली आहे. लागवडीखालील क्षेत्र ते वाढवत आहेत. जेणेकरून, अजून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतील.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!