हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी 10 हजार टन दूध पावडर आयात (Milk Powder Import) करण्यासाठी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे दुधाचे दर (Milk Rate) कोसळले असताना हा निर्णय घेण्यात आल्याने दूध उत्पादकांना (Dairy Farmers) मोठा फटका बसणार आहे.
दूध पावडर आयात (Milk Powder Import) केल्याने देशांतर्गत दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ शकते. सध्या, दुधाचे दर आधीच कमी आहेत आणि अतिरिक्त दूध उत्पादनासह, दुधाच्या पावडरमध्ये रूपांतरित केल्याने या आयात निर्णयामुळे योग्य भाव मिळणार नाही, ज्यामुळे आपल्या देशांतर्गत दूध उत्पादकांच्या आर्थिक स्थिरतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
यामुळे केंद्र सरकारने (Central Government) दूध पावडर आयातीचा (Milk Powder Import) घेतलेला निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Commerce Minister Piyush Goyal) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
देशातील व राज्यातील दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने भेसळयुक्त दूध व दूध पावडर (Adulterated Milk And Milk Powder) तयार करणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून, त्या कंपन्यांमुळेच बाजारात दुधाची कृत्रिम टंचाई (Milk Shortage) निर्माण केली जात आहे.
ही परिस्थिती अशीच राहिल्यास अजूनही दर झपाट्याने घसरण्याची शक्यता आहे. यामुळे दूध उत्पादक व ग्राहक या दोघांनाही याचा मोठा फटका बसणार असल्याचे शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे.