Women Entrepreneurs Scheme: महिलांसाठी सुरू होतेय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’; मिळणार 25 लाखांपर्यंत अर्थसहाय्य!

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्ट-अप्सना (Women Entrepreneurs Scheme) प्रारंभिक टप्प्यावर पाठबळ देण्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना” (Punyashlok Ahilyadevi Holkar Women Start-Up Scheme) राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करताना वेगवेगळी आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते. या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्याशिवाय आणि पुरेशा निधीअभावी यशस्वी होणे एक मोठे आव्हान असते.

महिला नेतृत्वातील स्टार्टअप, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनीमधून उदयास येणारे स्टार्टअप (Women Entrepreneurs Scheme) यांना सुरुवातीपासून प्रोत्साहीत करून राज्यात सुरू असणार्‍या इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे तसेच प्रोटोटाईप बनवणे इत्यादी करिता देखील सहाय्य करणे आवश्यक आहे.

महिला नेतृत्वातील स्टार्टअप (Women Entrepreneurs Scheme) यांना आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास अन्य महिलांना देखील रोजगार उपलब्ध होईल, स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेवर आधारित स्टार्टअप विकसित होतील, महिलांमध्ये आत्मनिर्भरता (Women Empowerment) वाढून त्यांच्यात  व्यावसायिक दृष्टिकोन विकसीत होईल तसेच शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होईल.

याकरिता महिला नेतृत्वातील (Women Leadership) स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरिता राज्यामध्ये ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ (Women Entrepreneurs Scheme) राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

योजनेतील लाभार्थी पात्रता व अटी
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार (Department for Promotion of Industry & internal trade) मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स.

  • सदर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक/सह संस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे.
  • महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा.
  • महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटी रुपये पर्यंत असावी.
  • महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरुपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा.

योजनेची अंमलबजावणी
सदर योजना (Women Entrepreneurs Scheme) राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे.

योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लाभार्थ्यांची निवड (Women Entrepreneurs Scheme)

  • सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या https://www.msins.in/  या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने निशुल्क अर्ज करता येईल.
  • अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे (MCA,) DPIIT मान्यता प्रमाणपत्र इ. कागदपत्रे आवश्यक असतील.
  • प्राप्त अर्जापैकी आश्वासक, नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येईल.
  • प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करण्याऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य राहील.

योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप

  • महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे.
  • राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थ सहाय्य करणे.
  • राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
  • देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे.
  • महिला स्टार्टअपच्या (Women Entrepreneurs Scheme) माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे.
  • या योजनेतील एकूण तरतूदीच्या 25 टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरीता राखीव ठेवण्यात येईल.
  • राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान रू.1 लाख ते कमाल रू. 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.