Women Entrepreneurs : सध्या आपल्याकडे असे अनेकजण असे आहेत जे शेती करत इतरही व्यवसाय करून चांगला नफा कमवतात. महिला देखील पुरुषांपेक्षा कमी नाही असा आपल्याकडे कायमच म्हटलं जातं, त्यातच एक उत्तम उदाहरण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील सुलभा कदम या तेल प्रक्रिया उद्योगातून लाखोंचा नफा कमवत आहेत. आज आपण त्यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यांनी हा उद्योग कसा सुरू केला? त्यांना कल्पना कुठून आली? त्यांची कमाई किती होते? या सर्व गोष्टींबद्दल माहिती पाहणार आहोत.
तेल प्रक्रिया उद्योग (Lakdi Ghana Business)
सुलभा कदम या अनेक दिवसापासून तेल प्रक्रिया उद्योग करत आहेत. यामध्ये आपण जसं गिरणीमध्ये गहू ज्वारी दळण्यासाठी नेतो तसं लोक त्यांच्याकडे तेल बिया घेऊन येतात आणि तेल काढून नेतात. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांकडून त्या दहा रुपये किलो प्रमाणे तेल काढून देतात. त्यामुळे यांना दिवसभरात चांगला नफा देखील राहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दिवसाला 6 हजार रुपयांची कमाई
सुलभा कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवसाला जवळपास सहा हजार रुपयांची कमाई करतात. दिवसाला त्या एका तासांमध्ये जवळपास 80 किलो तेल काढतात. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये जवळपास आठ तास लाईट असते असं सर्व गणित पाहतात त्यांना दिवसाला सहा हजार रुपयांची कमाई होते. दिवसभरात जवळपास सहा क्विंटल तेल बियापासून तेल काढतात. तसेच त्यांचे हे काम सीजनला जास्त वाढते म्हणजे दिवाळी असेल किंवा इतर कोणता सण उत्सव असेल यावेळी त्यांना जास्त काम असते. यावेळी त्या जनरेटरवर सुद्धा काम करतात. त्यामुळे सिझनच्या वेळी तर त्यांची कमाई दुप्पट होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सुलभा कदम यांनी उभारलेल्या प्रक्रियेमुळे कमीत कमी दरामध्ये चांगल्या दर्जाचे तेल मिळते त्यामुळे बाजारातील भेसळयुक्त तेल महागड्या दराने खरेदी करण्यापेक्षा हे तेल पटीने चांगले असल्याचे सुलभा कदम यांचे म्हणणे आहे. या प्रक्रिया उद्योगातून तेल उत्तम दर्जाचे निघतेच मात्र शेतकऱ्यांच्या जनावरांचा देखील याची पेंड उत्तम दर्जाची मिळते. यामुळे जनावरे देखील ही पेंड आवडीने खातात.
तेल प्रक्रिया उद्योगाची कल्पना कुठून आली
सुलभा कदम यांच्या बऱ्याच दिवसापासून तेल प्रक्रिया उद्योगाची कल्पना डोक्यात होत. यानंतर त्यांना लातूरच्या भारत ऍग्री टेकचा पत्ता मिळाला. त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन या मशीन बद्दल सर्व माहिती घेतली. त्या ठिकाणी देखील काही प्रयोग केले आणि ही मशीन खरेदी करण्याचा विचार केला. जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर भारत ॲग्री टेक लातूर यांच्याशी संपर्क साधून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.