Fisheries Day : मस्त्य उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर – परषोत्तम रूपाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मस्त्यपालन व्यवसाय हा देशातील प्रमुख व्यवसायांपैकी एक असून, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश (Fisheries Day) बनला आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मस्त्यपालन मंत्री परषोत्तम रूपाला यांनी केले आहे. जागतिक मस्त्यपालन दिनाचे (Fisheries Day) अवचित्त साधून केंद्र सरकारच्या वतीने अहमदाबाद येथे 21-22 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक मस्त्य संमेलन 2023’ कार्यक्रमात ते बोलत होते.

या संमेलनादरम्यान भारतातील प्रत्येक राज्यात मस्त्य व्यवसाय करण्यासह त्यासाठीची जैविविधता टिकवण्यासाठी मार्गदर्शन करणारी भारताची ‘राज्य मासे पुस्तिका’ या पुस्तिकेचे रुपाला यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या पुस्तिकेत राज्य मासा आणि राज्य जल पशु म्हणून घोषित केलेल्या 11 माशांच्या प्रजातींचे विवरण देण्यात आले आहे. त्यामुळे याचा मस्त्यपालन व्यवसाय करताना मोठा उपयोग होणार असल्याचे रुपाला यांनी नमूद केले आहे.

१० देशांचा सहभाग (World Fisheries Day In India)


जागतिक मस्त्य संमेलन 2023 मध्ये फ्रांस, न्यूझीलंड, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, रशिया, स्पेन, जिम्बाब्वे, अंगोला, ब्राझील आणि ग्रीस या 10 देशांनी सहभाग नोंदवला होता. याशिवाय संयुक्त राष्ट्राची अन्न आणि कृषी संघटना, आशियायी विकास बँक, यासारख्या आंतराराष्ट्रीय संघटनांसह अरुणाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यांसह केंद्र शासित प्रदेशांचे संबंधित विभागाचे मंत्री उपस्थित होते.

सर्वश्रेष्ठ पुरस्कारांचे वितरण

यावेळी उपस्थित मान्यवरांकडून मस्त्य व्यवसायात सर्वश्रेष्ठ कामगिरीसाठीचे पुरस्कार वितरित करण्यात आले. यात प्रामुख्याने गोड्या पाण्यातील मस्त्यशेतीसाठी उत्तरप्रदेश राज्याला, समुद्री मासेमारीसाठी आंध्रप्रदेश राज्याला, आसाम राज्याला हिमालयीन क्षेत्रातील मासेमारीसाठी तर तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्याला सर्वश्रेष्ठ मासेमारीसाठी गौरवण्यात आले. याशिवाय या कार्यक्रमात सर्वश्रेष्ठ मस्त्य शेतकरी पुरस्काराचेही वितरण करण्यात आले.

error: Content is protected !!