हॅलो कृषी ऑनलाईन : 5 डिसेंबर आज जागतिक मृदा (World Soil Day) दिवस. भविष्यात 2027 पर्यंत भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश होईल आणी इतक्या मोठ्या जनसंखेचे पोट भरण्याची जबाबदारी जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांवर राहील,ही एक मोठी संधी शेतकऱ्यांना असु शकते. येत्या काळात शेतीला व अन्नधान्याला जागतिक स्तरावर मागणी वाढेल व शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील यात शंका नाही.ग्रामीण भागातून अन्नपुरवठा झाला, तरच शहरांमधील माणूस जगेल हे ही खरे.उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करणे हे देशा समोर सुद्धा फार मोठे आव्हाण आहे याचे मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस बंजर होत चाललेली शेत जमीन.
शेती व शेतीशी संबंधित इतर साहाय्यक उद्योगधंदे म्हणजेच डेअरी, पोल्ट्री, गोटरी, मत्स व्यवसाय, खाद्य प्रसंस्करन उद्योग यांना चांगले दिवस येतील. सर्व दिवस सारखे नसतात म्हणून शेतकऱ्यांनी संकटातून मार्ग काढत येणाऱ्या संधीचा फायदा शेतीसाठी करून घ्यायचा आहे.यापुढील काळात शेतकऱ्यांनी नैराश्य सोडून सकारात्मक दृष्टीकोन ठेवत अन्नधान्य पिकविणे व आपल्या जमिनी जिवंत, कसदार ठेवणे गरजेचे आहे.
शेती आधारीत उद्योग (World Soil Day)
अन्नधान्य निर्मिती साठी भविष्यात शेडनेट, ग्रीन हाऊस, पॉली हाउस, काचगृहातील शेती, व्हर्टिकल फार्मिंग (मजल्याची शेती), डीप फार्म (भूमिगत व्हर्टिकल फार्मिंग), हायड्रोपॉनिक (मातीविना पाण्यावरील शेती) किंवा एरोपोनिक (हवेतील शेती) अशा विविध पद्धतींचा समावेश होणार.पारंपरीक शेती पद्धतीत प्रत्येक शेतकऱ्याची माती जिवंत, सुपीक, कसदार असणे ही येणाऱ्या काळाची गरज राहील असे असल्यास मागणी अनुरूप पिक पद्धती स्विकारल्या जाऊ शकते.करीता लेखात दिलेल्या महत्वाच्या गोष्टी समजून घेऊन आत्मसात कराव्या म्हणजे येणाऱ्या काळात संधीचे सोने शेतकऱ्यांना करता येईल.
— जमिनीत सेंद्रिय खतांसोबत जिवाणू खतांचा वापर केल्याने जमिनीची (World Soil Day) सुपीकता वाढविली व टिकविली जाऊ शकते.
–योग्य ओलावा असतानाच खते जमिनीत द्यावीत.
–उन्हाळ्यात जमिनीवर हरीत आच्छादनाचा वापर करावा.
–पिकांचे अवशेष न जाळता जमिनीत गाडावेत व त्यावर कंपोस्टर चा वापर करावा.
— भर खतांचा (शेणखत/ कंपोस्ट/ गांडूळ खत) व हिरवळीच्या खतांचा (धैंचा, बोरु,) नियमित वापर करावा. ♦️शेताच्या बांधावर वारा गतिरोधक म्हणून गिरिपुष्प, येरंडी व हिरवळीची पिके लावावीत.
–पाण्याचा अतिरेक वापर टाळावा.
–माती परीक्षणावर आधारित शिफारशीनुसार खतांचा वापर करून अन्नद्रव्यांचे संतुलन साधावे.
–पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.
— रायझोबीयम, पीएसबी, ॲझोटोबॅक्टर, झिंक, सिलिकॉन, सल्फर इ. जिवाणू खतांचा वापर करावा.
–समस्यायुक्त क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारकांचा (जिप्सम, सेंद्रिय खते, मिश्र पेंडी, प्रेसमड, उसाची मळी) चा वापर करावा.
–कुजलेलेच शेणखत जमिनीत टाकले गेले पाहिजे याची काळजी घ्यावी.
माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आजच्या दिवसाचा हार्दिक शुभेच्छा ! संपूर्ण जग हे काळया मातीवर अवलंबून आहे,आजचा दिवस साजरा करण्याचे कारण चआसे आहे की त्या अनुषंगाने आपण जमीनीचा व तीच्या आरोग्याचा विचार करावा! माती हे एक जीवंत संपती आहे.
जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे.
ता अचलपूर जी अमरावती
9404075628