जगातली सर्वात महागडी म्हैस; 81 कोटी किंमत, मालकाला फायदा कसा होतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांबद्दल आणि त्याच्या शेतीबद्दल बोलत असतो. पण शेतकरी म्हंटल तर पाळीव प्राणी यात आलेच. त्यातही म्हैस आणि शेतकरी यांचं नातंच वेगळं, म्हैशी पाळून तिच्या दुधातून अनेक शेतकरी आर्थिक नफा कमवतात आणि त्याच्या प्रपंचाला हातभार लागतो. पण मित्रानो, तुम्हाला जगातील सर्वात महागडी म्हैस माहिती आहे का? जगातील सर्वात महाग म्हैस ही दक्षिण आफ्रिकेत आहे. या आफ्रिकन म्हशीचं नाव होरीजोन असून तिची किंमत तब्बल ८१ कोटी आहे.

जर आपण आपल्याकडील सध्या म्हशी बघितल्या तर त्यांच्या शिंगाची लांबी ही 35 ते 40 इंच असते. पण या आफ्रिकन म्हशीच्या शिंगाची लांबी 56 इंच इतकी आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला अशा प्रकारची म्हैस पाळणं केवळ अशकय आहे, याचे कारण म्हणजे या म्हशीचा खुराक… या हॉरिजन म्हशीच्या शिंगाच्या साईज वरून तुम्हाला ती म्हैस किती मोठी असेल याचा अंदाज आला असेल.

मालकाला फायदा कसा होतो ?

या म्हशीची किंमत पाहिली तर या किमतीत तुम्ही खूप काही करू शकता, त्यामुळे एवढा पैसा खर्च करून ही म्हैस विकत घेण्याचं लॉजिक काय असेल असा प्रश्नही तुमच्या मनात नक्कीच आला असेल. तर आम्ही तुम्हाला त्यामागील कारणही सांगणार आहोत. या म्हशीचे पालनपोषण करणारा शेतकरी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. होय, याचे कारण म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या घरात या जनुकाची एक म्हैस हवी असते आणि त्यासाठी या म्हशीचे शुक्राणू जगभरातील शेतकरी आपल्या म्हशीच्या पोटात लावतात. या शुक्राणूंच्या विक्रीच्या माध्यमातूनच या म्हशीचा मालक बक्कळ पैसे कमवतोय.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही नवी म्हैस किंवा गाई अथवा कोणताही पाळीव प्राण्याची खरेदी किंवा विक्री करायची असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी ओपन करताच त्यामध्ये तुम्हाला पशुपालन हा विभाग दिसेल. त्यावर क्लीक करताच पशूंची खरेदी- विक्री हा पर्यंत आपल्यासमोर येईल. यामध्ये तुम्हाला तुमच्या आसपासचे सर्व पशु आणि त्यांच्या किमती दिसतील. यामधील तुम्हाला जो प्राणी खरेदी करायचा असेल त्याच्या मालकाला थेट संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर सुद्धा देण्यात आला आहे. यामुळे कोणत्याही पशुची खरेदी – विक्री करताना एजंटला जो पैसा आपण देतो तो वाचू शकतो. अशाप्रकारे तुम्ही तुम्ही हव्या त्या पशुची खरेदी- विक्री अगदी घरबसल्या आणि १ रुपया सुद्धा खर्च न करता करू शकता. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

भारतातील महागडी म्हैस कोणती ?

जगातील सर्वात महागडी म्हैस तर आपण बघितली. आता तुम्हाला भारतातली सर्वात महागडी म्हैस माहिती आहे का? भीम ही भारतातील सर्वात महाग म्हैस आहे. ही म्हैस अरविंद जांगीड यांच्याकडे असून तिची किंमत 24 कोटी रुपये आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु, या म्हशीचे वजन सुमारे 1500 किलो एवढे आहे.

error: Content is protected !!