वाह क्या बात …! सेंद्रिय खताची कमाल ; निघाले ऊसाचे एकरी 158 टन उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो अनेक शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आपल्या शेतात काही नवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेताना आढळतात. विट्यातील एक शेतकऱ्याने देखील एका एकरमध्ये तब्बल १५८ टन इतके उसाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या शेतात उतपादन वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विट्यातील सूर्यनगर परिसरात राहणारे शेतकरी बाळकृष्ण सूर्यवंशी यांनी एकरी १५८ टन इतके उसाचे भरघोस उतपादन घेतले आहे. सूर्यवंशी यांनी साडेआठ एकर क्षेत्रामध्ये उसाची लागवड केली यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सची उत्पादने त्यांनी वापरली. आडसाली उसाची लागण करून त्यांनी हे विक्रमी उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या उसाला 40 ते ७८ कांड्या एका ऊसाला आहेत. आपल्या शेतीकरिता जैविक खतांचा वापर केला. याकरिता जयदेव बर्वे यांच्या नेचर फर्टीलायझर च्या मार्गदर्शनाने ही किमया साध्य झाली असल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितला आहे.

हे विक्रमी उत्पादन घेत असताना त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. खत आणि पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले. साडे चार फुटी सरी ठेवून त्याने लागण केली. दीड फुटांवर 86-0-32 या वाणाच्या उसाची लागवड त्यांनी केली होती. नेचर केअर फर्टिलायझर्स कंपनीने उत्पादित केलेली ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत यांनी वापरली. तसेच कंपनीच्या मार्गदर्शनानुसार नेचर केअर ची ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत अन्नद्रव्य आणि जैविक खताची मात्रा त्यांनी आपल्या ऊस पिकाला दिली आहेत.

याकरिता त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त शास्‍त्रज्ञ सुरेश माने आणि नेचर केअर फर्टिलायझर्स चे बर्वे यांच्या टीमने वेळोवेळी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना बर्वे म्हणाले सूर्यवंशी यांनी प्रचंड मेहनत आणि चिकाटीने उसाचा प्लॉट घेतला. यासाठी सुरेश पाटील आणि नेचर केअरचे मला मार्गदर्शन केलं सेंद्रिय खतांच्या वापरामुळे त्यांना चांगलं उत्पादन मिळाल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!