एकावं ते नवलच! श्रीगोंदा तालुक्यात पिवळ्या कलिंगडाची शेती; मोठी मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी लोणार येथे तरुण शेतकऱ्याने पिवळ्या कलिंगडाची लागवड केली. शेती व्यवसायात पिवळे कलिंगड हे पहिल्यांदाच ऐकलं असेल. मात्र याच कलिंगडाची लागवड करण्यात आली. या कलिंगडाला अधिक मागणी देखील मिळाली आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं शाश्वत दर मिळाला.

या पिवळ्या कलिंगडाची लागवड करण्यासाठी त्यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रात एकूण १२ हजार पिवळ्या कलिंगडाची विशाला, आरोही, सरस्वती या वाणाची रोपे लावली आहेत. यासाठी त्यांना ७० ते ७५ हजार रुपये खर्च आला. विशाला कलिंगड हे बाहेरून पिवळे आणि आतून लाल रंगाचे असते. तसेच सरस्वती वाणाचे कलिंगड हे इतर सामान्य कलिंगडासारखे आतून लाल आणि बाहेरून हिरवे असते. आरोही वाणाचे कलिंगड हे बाहेरून हिरव्या आणि आतून पिवळ्या रंगाचे असते. या कलिंगडाला शहरी भागात अधिक मागणी पहायला मिळते. तसेच उत्पादन घेतलेल्या व्यक्तीने एका कंपनीसह कॉन्ट्रॅक्ट केलं आहे.

संजय रोडे यांनी एका कंपनीसह कॉन्ट्रॅक्ट करून या तीनही कलिंगडाच्या वाणाची ४ ते ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता वर्तवली होती. पारंपरिक पिकाला फाटा देऊन योग्य नियोजन करून संजय रोडे यांनी चांगले उत्पन्न मिळवून आपल्या परिसरात नाव कमावलं आहे.

जाती

कलिंगडाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि संकरीत अशा अनेक जाती आहेत. त्यातली शुगर बेबी हि २-२” किलो वजनाची फळे देणारी, अतिशय गोड, लाल आणि बारीक बियांची ११ ते १३ टक्के साखरउतारा असणारी हि जात विक्रीयोग्य आहे. फक्त ७५ ते ८० दिवसात हि फळं तयार होतात. अरका माणिक हि लम्बवर्तुळाकार पांढरट पट्टे असणारी ५ ते ६ किलो वजनाची फळं, गर्द लाल रवेदार गार आणि १२ ते १५ टक्के साखर असणारी हि जात वाहतुकीस आणि साठवणीस योग्य आहे हि १०० दिवसात तयार होते. असाही यामोटो हि जपानी जात ४ ते ७ किलो वजनाची फळे देणारी, ९० दिवसात तयार होणारी,गर गोड, बारीक बियांची उत्पादनक्षम अशी जात आहे.

या सुधारित जातींप्रमाणेच काही खाजगी कंपनीच्या संकरीत जाती भरपूर आहेत. त्या जातींचा अनुभव लक्षात घेऊन लागवडीसाठी निवड जरूर करावी. महिको, नामधारी, अमर सीड्स अशा खाजगी कंपन्यांच्या या अनेक जाती उपलब्ध आहेत. या संकरीत जातींची फळे सरासरी ४ ते ८ किलो वजनाची असून एकरी ३० ते ४० टन उत्पादनक्षम असतात.

error: Content is protected !!