हॅलो कृषी ऑनलाईन: यावर्षी मॉन्सून वेळेवर आल्यामुळे सोयाबीनची (Yellowing Of Soybean Leaves) पेरणी केलेली आहे. परंतु मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली आहे. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिवळे (Yellowing Of Soybean Leaves) पडण्याची समस्या निर्माण होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (VNMKV, Parbhani) तज्ज्ञांनी (Crop Expert) यामागील कारणे आणि त्यावर होणारे उपाय याबाबत शिफारस केलेली आहे. जाणून घेऊ सविस्तर.
सोयाबीन पिवळे पडण्याची कारणे (Yellowing Of Soybean Leaves)
जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन (Soybean Crop) सुरवातीलाच रोप अवस्थेतच पिवळे- पांढरे पडत आहे. लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस ही जमिनीत लोहाच्या (फेरस) कमतरतेमुळे होत नसून ती काही कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न केल्याने होते.
लोहची कमतरता (Iron Deficiency In Soybean Crop) विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणार्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य-क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह असते. बर्याचदा जमिनीचा सामू (Soil PH) 7.5 पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते. तसेच जमिनीत मुळांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने देखील मुळाद्वारे लोह कमी शोषला जाऊन क्लोरासीस (Soybean Chlorosis) होतो.
सोयाबीन क्लोरोसिसची लक्षणे
लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो (Yellowing Of Soybean Leaves) आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दिसतात. पाने पिवळी पडल्यामुळे (Yellowing Of Soybean Leaves) हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.
व्यवस्थापन (Soybean Chlorosis Management)
- पाण्याचा ताण पडल्यास तुषार सिंचनाच्या (Sprinkler Irrigation In Soybean Crop) सहाय्याने संरक्षित पाणी द्यावे.
- ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला असेल अशा शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी.
- वापसा आल्यानंतर पीक 30-35 दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी.
- ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) 50 ग्रॅम किंवा 50 मिली +19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास 8-10 दिवसांनी परत एकदा फवारणी करावी.