कोरोनात नोकरी गेली, पण तो खचला नाही; अंजीराच्या शेतीतून कमावतोय लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ३ वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला आर्थिक फटका बसला आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर काही काही युवकांची गावाकडचा रस्ता पकडला. काही लोकांनी न खचता खेडेगावात राहूनच कष्ट केले आणि स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रेयत्न केला. असच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या खेडेगावातील तरुण अभिजित लवांडे… कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर अभिजित घरी आला आणि शेतात अंजीर पिकाची लागवड करून लाखो रुपयांची कमाई केली.

अभिजीतने वडिलोपार्जित ९ एकरातील ३० गुंठे जमिनीतून अंजिराची शेती उभारली. यातून त्याने लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले. त्यांना कृषी विभागाकडून शेततळ्याचा लाभ तसेच कृषी विषयक प्रशिक्षण मिळाले असून त्याचा मोठा फायदा झाला आहे. अभिजीतने अंजिरसह इतरही पिकांची सुद्धा लागवड केली. त्याने ४ एकरात अंजीर, ३ एकरात शिताफळ, तसेच पाऊण एकरामध्ये जांभूळ पिकाची देखील लागवड केली. यासाठी त्याला कुटुंबाची मोलाची साथ लाभली आहे.

अंजीर राज्यातील काही भागात निर्यात केले जात असून जर्मनीत देखील अंजिराचा डंका वाजत आहे. अशावेळी त्याला अंजीर पिकातून १० लाखांचे उत्पन्न मिळाले. तसेच देशात सासवड, पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैद्राबाद, गुजरात व दिल्ली येथे त्यांच्या अंजीरची विक्री केली जाते. मागील वर्षी जर्मनीतून अंजिराला मागणी आल्याने अभिजित यांनी प्रायोगिक स्वरुपात १०० किलो मालाची निर्यात केली. महाराष्ट्रासह हैद्राबाद, गुजरात राजस्थान आदी ठिकाणचे शेतकरी अभिजित लवांडे यांची अंजीर बाग पाहण्यास येतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन सुद्धा घेतात.

error: Content is protected !!