शेतकऱ्यांनो सावधान ! शेती करताना डोळ्यात होतोय आळीचा संसर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना माणसाला समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी काय होईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत आपण शेतात जनावराने शेतकऱ्याला चावा घेतल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं ऐकलं असेल. परंतु शेती करताना डोळ्यात कीटकांची अंडी तयार झाल्याचं ऐकलं नसेल. परंतु असाच धक्कादायक प्रकार राहुरी येथे घडला आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात आळी

राहुरी येथे काही १५ ते २० शेतकरी मजूर काम करत होते. कांद्याची लागवड केलेल्या शेतात त्यांचं काम सुरू होतं. यावेळी शेतातील माती डोळ्यात गेली यामुळे डोळ्यात कीटकांची अंडी गेली. कांद्याच्या आणि लसणाच्या पिकात आळ्यांचं प्रमाण अधिक असते. त्याच शेतात कीटकांचे प्रमाण कांद्याच्या शेतातील जमिनीवर आढळून येतात. यावेळी शेत मजुरांच्या डोळ्याला त्या मातीचा आणि कीटकांचा संसर्ग झाला. त्या कीटकांची अंडी डोळ्यात गेल्याचं म्हटलं जातंय. यामुळे हा आजार झाल्याची चर्चा सुरू आहे. कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ डॉ. भारत पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तेव्हा ते म्हणाले घाबरायच कारण नाही. हा आजार यापूर्वी उत्तर भारतात होता. परंतु हा प्रथमच आपल्या राज्यात पहायला मिळाला आहे. त्यानंतर मजूरदारांना नेत्रतज्ज्ञांकडे नेण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

सेफ्टी गॉगल वापरण्याचं डॉक्टरांचं आवाहन

हा आजार जवळ जवळ १५ ते २० शेतमजुरांना झाला आहे. यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. परंतु त्या ठिकाणाहून त्यांना राहुरी खासगी रुग्णालयात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे शेतात काम करत असताना डोळ्याला संरक्षण म्हणून सेफ्टी गॉगल घालावेत असा सल्ला नेत्र तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच वेळीच उपचार केले इतर इतर व्याधी होणार नाहीत असं नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अभिषेख शिंदे म्हणाले.

error: Content is protected !!