Agriculture News : मुख्यमंत्रांनी शेतकऱ्यांना दिली चांगली बातमी; मंत्रिमंडळळ बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) काल पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांना चांगली बातमी दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. (agriculture news)

मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस राज्यातील काही भागात थैमान घालत आहे. यामुळे सततचा पडणारा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून समजले जाईल असा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. यामुळे मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रातील अन्य भागातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

नव्या निकशासह सलग ५ दिवस १० मिलिमीटर पाऊस झाल्यास नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली जाणार आहे. आतापर्यंत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर आपत्ती समजली जात होती. पण आता या निकषात बदल करण्यात आला आहे. यामुळे अवकाळी पाऊसामुळे होणाऱ्या नुकसानावरसुद्धा सरकारकडून मदत देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळात घेण्यात आलेले निर्णय :

1) शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित
2) ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद
3) नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता. 43.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारणार
4) देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल
5) सेलर इन्स्टिट्यूट ‘सागर’ भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण
6) महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.
7) अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
8) नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता ‘परिस स्पर्श’ योजना

दरम्यान, बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. वादळी पाऊस, गारपीटने शेतकऱ्याचे नुकसान होते आहे. त्यातून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

error: Content is protected !!