हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Story) : कोरोना (Covid 19) या महामरीने गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना वाईट दिवस दाखवले. काही लोकांनी घरे विकून गावाकडे मार्गिक्रमण केलं. काहींच्या नोकऱ्या गेल्या. गावी जाऊन करायचं काय? काही लोकं बेवारस झाली. याच परिस्थिती काही लोकं नव्याने उभी राहिली. असाच एक मुलगा कोरोना महामारीच्या काळात नोकरी सुटल्याने गावाकडे गेला. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील मुंडीपार या गावातील शुभम टेंभूर्णे आता शेतीत रमला. त्यांनी आपल्या वडिलांसह शेती करण्यासाठी सुरुवात केली. आज तो भरघोस पीक देखील घेतोय.
शुभमकडे वडिलोपर्जित ५ एकर शेती आहे. यापैकी तो पाऊण ते दीड एकरात लाखोंच्या घरात कमाई करत आहे. त्याने पाच एकरामधून पाऊण एकरात काकडी या पिकाची लागवड केली. तसेच उर्वरित पाऊण एकरात चवळी, दोडका, कारले या पैकांची शेती केली. यातून त्याला दीड लाख रुपये नफा मिळण्याची अपेक्षा त्याने वर्तवली आहे. तसेच काकडी या पिकात त्याला तीन महिन्याने दीड लाख रुपये नफा मिळावा. असे त्यांचे म्हणणे आहे. एकूण तीन लाख रुपयांपर्यंत त्याला नफा मिळण्याची शक्यता आहे.
सहा महिन्यात ३ लाखांपर्यंत उत्पन्न
काकडी या पिकासाठी एकूण तीन महिन्यात २२०,००० रुपये इतकी अवाक असावी आणि यातून ८० हजार रुपये हा खर्च असावा उर्वरित दीड लाख रुपये नफा मिळावा अशी अपेक्षा शुभमने मनात धरली आहे. त्याचप्रमाणे काकडी, दोडके, कारले, चवळी यातून सहा महिन्यात शुभमला ३ लाख रुपये इतका नफा मिळण्याची शक्यता आहे. मुंडीपार या छोट्याश्या गावात शुभमने पहिल्यांदाच काकडीची लागवड केली. अधिकाधिक उत्पादन मिळवले आहे. आता शुभमला पाहून अनेक तरुण शेती करण्यासाठी उतरले आहेत. ही एक तरुण पिढीसाठी क्रांतीच आहे. त्याने शेती व्यवसायात टाकलेलं पाऊल ही इतरही तरुणांसाठी प्रेरणा आहे. याच व्यवसायातून बाजारपेठेत काकड्यांची विक्री करून त्याने सुरुवातीला २५ हजार रुपयांची कमाई केली.
काकड्यांच्या विक्रीतून कमावले 25 हजार (Agriculture Story)
सध्या बाजारात २० ते २५ हजार रुपयांची काकडी बाजारात विकली गेली आहे. ही काकडी १० ते १५ रुपये किलोने विकली आहे. तसेच सध्या उन्हाळा आल्याने काकडीला अधिक मागणी आहे. यासाठी १५ ते २० रुपये किलोने विकली तर आर्थिक उत्पन्न दोन लाखांपर्यंत मिळेल. या तीन महिन्यात एकूण 80 हजारांचा खर्च होणार असून उत्पन्न 2 लाख 25 हजार रुपयांपर्यंत होणार आहे. तीन महिन्यांचा 80 हजारांचा खर्च वजा केल्यास निव्वळ उत्पन्न हे 1 लाख 60 हजारांपर्यंत खर्च शिल्लक राहणार आहे.
भाताच्या शेतीतही बसवला जम
एवढंच नाही तर शुभमने दोन एकरात पारंपरिक भाताची शेती केली असून प्रतिएकरनुसार ३५ हजार रुपये नफा मिळणार आहे. म्हणजे दोन एकरात ७० हजार रुपये नफा मिळणार आहे. दोन एकरात 45 क्विंटल धान्य निघणार असून त्यातून 1 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. याचाच अर्थ खर्च 70 हजारांचा कमी केल्यास हातात केवळ 30 हजार रुपयांचा नफा होईल. एक एकरातील बागायती शेतीतून सहा महिन्यात निव्वळ उत्पन्न 3 लाखांचे तर, पारंपरिक भाताच्या दोन एकरातून सहा महिन्यात केवळ 30 हजारांचे उत्पन्न शुभमने आपल्या शेतीतून भरघोस पीक मिळवून लाखोंच्या घरात कमाई केली.