Agriculture Technology : शेतातील 50 कामे एकच मशीन करणार; काढणी पासून खड्डा काढण्यापर्यंत सगळंकाही झालं सोप्प (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) । शेतकर्‍यांनो आज आम्ही तुम्हाला शेतीतील नवीन जुगाड दाखवणार आहे. अनेकदा आपल्याला शेतातील कामे करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. गहू काढणी असो वा गवत कापणी आता हि सर्व कामे करणे सोपे झाले आहे. यासाठी बाजारात मिळणारे एक मशीन तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचवू शकते. काय आहे हा जुगाड? मशीन कुठे मिळेल आणि किंमत काय अशी सर्व माहिती आम्ही या लेखात दिलेली आहे.

शेतकरी मित्रांनो या मशीनचे नाव आहे ब्रश कटर. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे एकटे मशीन जवळपास ५० प्रकारची कामे करते. मशिनसोबत कंपनीने वेगवेगळे टूल्स दिले आहेत. विविध कामांसाठी त्या टूल्सचा वापर होतो. गवत कापणे, गहू काढणे यासाठी एक गोलाकार ब्लेड देण्यात आलेय तर फांद्या छाटण्यासाठीही विशेष टूल देण्यात आले आहे. गुगल प्ले स्टारवरील Hello Krushi या मोबाईल अँपवर हे मशीन तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध आहे.

किंमत –

या मशीनची किंमत केवळ १७ हजार रुपये आहे. या मशीनला एक मोटार जोडण्यात आली असून ती पेट्रोलवर चालते. साधारणपणे एका तासात हि मशीन १ लिटर फ्लुअल चा वापर करते. मशिनसोबत मिळणाऱ्या इतर टूल्समुळे १७ हजार रुपयांत मिळणारी हि मशीन अगदी ट्रॅक्टरने होणारी काम तेही करते. तसेच मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

तुमच्या गावाजवळील सर्व Tractor, JCB, ऊस तोडणी यंत्र, रोटावेटर यांच्याशी असा साधा संपर्क

शेतकरी मित्रांनो अनेकदा आपल्याला आपल्या गावाजवळील भाडेतत्वावर सेवा देणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळत नाही. यामध्ये ऊस तोडणी यंत्र, गहू काढणी यंत्र, ट्रॅक्टर, रोटावेटर, JCB अशा यंत्राचा समावेश आहे. आपल्याला शेतीच्या कामाकरता हि यंत्रे वरचेवर लागत असतात. परंतु अनेकदा आपल्या गावातील यंत्र कुठेतरी कामावर असल्याने आपल्याला वाट पाहत बसावी लागते. मात्र आता Hello Krushi या मोबाईल अँप च्या साहाय्याने आपल्याला आपल्या गावाच्या जवळील कोणत्याही भाडेतत्वावर सेवा देणाऱ्या यंत्राच्या मालकाला फोन करता येऊ शकतो. त्यामुळे आता ऊस तोडणी यंत्र, गहू काढणी यंत्र यांना शोधण्यासाठी तुम्हाला दुचाकीवरून आसपासची गावं पालथी घालण्याची अजिबात गरज नाही. यासाठी खालील Download या बटनावर क्लिक करून

ब्रश कटर (Brush Cutter) मशिनसोबत कोणकोणते टूल्स मिळतात?

डायमंड कटर – या मशीनला डायमंड कटर हे टूल जोडल्यास शेतातील मका, ज्वारी, गहू, बाजरी या पिकांची कापणी करता येते. हे मशीन वापरून एक व्यक्ती चार ते पाच तासांत एका एकराची कापणी करू शकते. याद्वारे लहान झाडेही कापता येतात.

नायलॉन कटर – याच मशीनला नायलॉन कटर जोडून बागेतील, लॉनमधील किंवा शेतातील कमी उंचीचे गवत कापता येते. तसेच बांधावरील गवतही कापता येते.

टिलर – या मशीनला टिलर हे अवजार जोडून ऊस पिकात टाकलेले खते मातीमध्ये मिसळता येतात. जमिनीची वरच्या भागात मशागत करता येते.

शुगरकेन हार्वेस्टर – या मशीनला ब्लेड जोडून जमिनीपासून कमी अंतरावर ऊसाची कापणी करता येते. तसेच ऊस तोडल्यानंतर खोडव्याची बुडखे छाटण्यासाठी याचा वापर करता येतो.

या मशीनला विविध अटॅचमेंट जोडल्यास जवळपास ५० कामे करता येतात. हे मशीन १ लिटर डिझेलमध्ये एक तास चालते. त्यामुळे शेतकर्‍यांना हे चांगेल परवडू शकते. या मशीनची किंमत सुमारे १७००० रु. इतकी आहे. मशीन बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा कमी किमतीत विकत घेण्यासाठी गुगल प्ले स्टारवरून Hello Krushi नावाचे अँप आजच इन्स्टॉल करा. हॅलो कृषी मोबाईल अँपवर तुम्हाला रोजचे बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे आदी सेवासोबतच शेतकरी दुकान विभागातून स्वस्तात खरेदी विक्रीची सोयही देण्यात आली आहे.

error: Content is protected !!