Agriculture Technology : पेरणी करताना ‘या’ यंत्राचा वापर कराल तर होईल जादू! उगवण चांगली अन उत्पन्नात वाढ होऊन खर्चही होईल कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) | शेतकर्‍यांसाठी खरीप हंगाम खूप महत्त्वाचा मानला जातो. खरिपात शेतकरी बाजरी, मका, खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर आदी पिके घेत असतो. पूर्वी शेतकरी बैलाच्या साह्याने मशागत करून जमिनीवर हाताने बियाणे फेकायचे. त्यानंतर ते पुन्हा मातीत मिसळले जायचे. त्यामुळे पिकांची उगवण काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी दाट होते. हाताने फेकलेले बियाणे वरचेवर पडल्यामुळे पावसाने वाहून जाते.

इथे मिळतील सर्वात कमी किंमतीत शेती उपयोगी उपकरणे

आज काल शेती करताना अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अगदी स्वस्तात मिळणारी काही उपकरणे, मशीन शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे असे दोन्ही वाचवत आहेत. तुम्हाला शेती उपयोगी कोणतेही यंत्र घ्यायचे असेल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्या. इथे ५० % डिस्काउंटमध्ये अनेक प्रकारची शेतीमधील अवजारे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच रोजचे बाजारभाव, जमीन मोजणी, सरकारी योजना अर्ज करणे, खरेदी विक्री अशा अनेक सेवा इथे मोफत दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून लाभार्थी बना.

आता आपल्याकडे शेतकरी ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतात. या पद्धतीत हातानेच दोन चाड्याच्या पाभरीने पेरले जाते. त्यामुळे बियाणे काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी विरळ उगवण होते व दोन रोपातील अंतर कमी-जास्त होते. त्यामुळे पिकांमध्ये अन्न, पाणी, सूर्यप्रकाश यांसाठी स्पर्धा निर्माण होते. त्यामुळे पिकाची एकसारखी वाढ होत नाही व उत्पादनात घट येते. मात्र, खत-बीज ड्रील यंत्राचा म्हणजेच पेरणीयंत्राचा जर शेतकर्‍यांनी बियाणे पेरणीसाठी वापर केला तर उत्पादनात वाढ व मजुरीखर्चात बचत होणार आहे. (Agriculture Technology)

खत-बीज ड्रील यंत्राचा वापर

सध्या शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना दिसत आहे. बरेचसे शेतकरी बियाणे पेरणीकरिता पेरणीयंत्राचा वापर करताना दिसत आहेत. सध्या बाजारात ट्रॅक्टरचलित, बैलचलित, पॉवर टिलरचलित तसेच मानवचलितही पेरणीयंत्र उपलब्ध आहेत.

काय आहेत पेरणी यंत्राचे फायदे ?

पेरणी यंत्रामुळे दोन ओळी आणि दोन रोपांमधील अंतर योग्य पद्धतीने राखले जाते. त्यामुळे खते, पाणी व सूर्यप्रकाशासाठी पिकांमध्ये स्पर्धा होत नाही व पीक जोमदार येते. दोन ओळींमध्ये समान अंतर राखले जात असल्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. तण नियंत्रणासाठी हातकोळप्याचा किंवा छोट्या पॉवर वीडरचा वापर करता येतो. पेरणी करताना बियाण्याबरोबर खतेही देता येत असल्याामुळे पिकाला वेगळ्या पद्धतीने खत देण्याची गरज पडत नाही. पेरणी करताना खते पिकाच्या मुळाजवळच पडतात. त्यामुळे पिकाला ती लवकर उपलब्ध होतात. सुरुवातीलाच पिकाला खते मिळाल्याने पीक जोमदार येते व उत्पादनातही मोठी वाढ होते.

error: Content is protected !!