Agriculture Technology : शेतकरी घरबसल्या घेऊ शकतात कृषी योजनांचा लाभ; विम्यापासून अनुदानापर्यंतच्या सर्व सुविधा ‘या’ App वर मोफत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) । शेती क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी सरकार नेहमी नवनवीन योजना आणत असते. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी अनुदान देऊन सरकार शेती क्षेत्रासाठी भरीव काम करत आहे. मात्र अनेकदा अपुऱ्या माहितीमुळे किंवा अर्ज कसा करायचा याची माहिती न मिळाल्यामुळे शेतकरी सरकारी योजनांपासून वंचित राहतात. मात्र आता Hello Krushi मोबाईल अँप च्या मदतीने शेतकरी घरी बसून कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करू शकतोय. तसेच विम्यापासून अनुदानापर्यंतच्या सर्व सुविधा हॅलो कृषी अॅपवर मोफत असल्याने याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होतोय.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार विविध योजना आणते. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सबलीकरण तर मिळतेच, शिवाय शेतीत चांगले काम करण्यासाठी त्यांचे मनोबलही वाढते. शेतकरी या योजनांना अर्ज करण्यासाठी कृषी विभाग किंवा ई-मित्र सेवा केंद्रांवर जात होते. मात्र आता त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय घरबसल्या सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. शेतकर्‍यांच्या सोयीसाठी हॅलो माध्यम समूहाने Hello Krushi नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले आहे. तुम्हीसुद्धा गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi असं सर्च करून हे अँप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता.

Hello Krushi ऍप्लिकेशनवर, तुम्हाला कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन आणि कृषी विपणनाशी संबंधित योजना किंवा सुविधांची माहिती मिळू शकेल आणि थेट लाभ मिळू शकेल. सर्व योजनांची तपशीलवार माहिती या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. (Agriculture Technology)

कृषी तज्ज्ञांच्या मते, सर्व प्रकारच्या कृषी कामांसाठी खास उपलब्ध कृषी यंत्रांची माहिती, किंमत आणि भाड्याचा तपशीलही Hello Krushi अँपवर देण्यात आल्या आहेत. यासोबत या अँपच्या मदतीने शेतकरी अवजारे, जमीन, यंत्रे, शेतमाल यांची खरेदी विक्रीसुद्धा करू शकतो.

या अॅपमध्ये, कृषी कामांचे व्हिडिओ, हवामान अपडेट, बियाणे, खते, कीटकनाशके विक्रेत्यांची यादी, पिकांची किमान आधारभूत किंमत, स्टोरेज हाऊसची यादी आणि स्थान आणि महाराष्ट्रातील कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादनांचे निर्यातदार यादी अन त्यांचे मोबाईल नंबर देखील दिले आहेत. अशाप्रकारे Hello Krushi अॅप्लिकेशनमध्ये शेतीशी संबंधित जवळपास सर्व सुविधा उपलब्ध आहेत. (Agriculture Technology)

Hello Krushi मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?

१) सातबारा, डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र अतिशय सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात.
२) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने १ रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
३) सर्व सरकारी योजनांना मोबाइलवरूनच अर्ज करून लाभ घेता येतो.
४) आपल्या गावातील पुढील ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज समजतो.
५) आपल्या गावाजवळील सर्व खत दुकानदार यांना फोन करण्याची सोया
६) आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
७) जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
८) शेतमाल थेट ग्राहक मिळतो.

error: Content is protected !!