कृषी सल्ला : केळी, द्राक्ष अशा फळबागांचे हिवाळ्यात कसं नियोजन करावं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो हॅलो कृषी नेहमीच शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला देत असते. राज्यातील कृषी तज्ञांकडून योग्य वेळी योग्य कृषी सल्ला देण्यात येतो. अनेक शेतकरी हॅलो कृषी डॉट कॉम ला भेट देऊन आपली प्रगती करत आहेत. सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरु आहे. हवामानातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे पिकांबरोबरच फळबागांवरही मोठा परिणाम पडत असतो. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या फळबागांची काळजी कशी घ्यावी? बागेचं खत, पाणी नियोजन कस लावावं? याबाबत आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील फळ लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. आता शेतकरी आपली फळे थेट बांधावरून विकू शकतात. Hello Krushi ने याकरता खास मोबाईल अँप तयार केले असून शेतकऱ्याच्या शेतमालाला थेट ग्राहक मिळवून देने यामुळे शक्य झाले आहे. याकरता तुम्हाला खालील लिंकवर क्लिक करून हॅलो कृषीच मोबाईल अँप इन्स्टॉल करावं लागेल.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून (घडांना सर्क्टींग करावी). केळी बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे, जेणेकरून बागेत मणी तडकण्याची समस्या उद्भवणार नाही. द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड वर्तमान पत्राच्या साहाय्याने झाकून घ्यावेत. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे.

सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

error: Content is protected !!