Bhunaksha : जमिनीचा नकाशा काढणं झालं एकदम सोपं! ‘या’ नवीन पद्धतीने पहा हद्दी, मोजणीसुद्धा होते Free…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जमिनीचा नकाशा (Bhunaksha) हि एक अतिशय महत्वाची बाब आहे. पूर्वी जमिनीचा नकाशा काढण्यासाठी तलाठी कार्यालय अन भूमिअभिलेखच्या चकरा माराव्या लागायच्या. मात्र आता गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi अँपवर तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा नकाशा अगदी सहज काढू शकता. इतकेच नाही तर यासोबत सातबारा उतारा, डिजिटल सातबारा हि कागदपत्र डाउनलोड करण्याची सुविधासुद्धा या अपवर आहे. तसेच शेतकरी Hello Krushi मोबाईल अँपच्या मदतीने स्वतः आपली शेतजमीन मोफत मोजू शकतोय.

शेतकरी मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला आपल्या जमिनीची हद्द पाहण्यासाठी, एखादा नवा रास्ता काढायचा असल्यास जमिनीच्या नकाशाची आवश्यकता भासते. आता सातबारा आणि आठ अ उताऱ्यासह भू -नकाशा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काढता येतो. तुम्ही तुमचा मोबाईल वापरून सुद्धा नकाशा काढू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.

१) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा.
Link : https://bit.ly/HelloKrushiApp

२) ऍप Install केल्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.

३) आता ऍप ओपन करुन होम पेज वरील ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.

४) त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पुन्हा ६ विभाग मिळतील सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई -चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. इ. यापैकी भू-नकाशा विभागावर क्लिक करा.

५) त्यानंतर एक वेबपेज ओपन होईल. (Bhunaksha)

६)या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल.

७)या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तर तुम्हाला रुरल हा ऑप्शन निवडावा लागेल आणि जर तुम्ही शहरी भागात राहत असाल, तर अर्बन पर्याय निवडावा लागेल.

८)त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.

९)गाव निवडल्यानंतर आता स्क्रीनवर सदर गावातील गट नम्बरची लिस्ट दिसेल. यातील तुमचा गट नंबर निवडा.

१०) आता तुम्हाला स्क्रीनवर सदर गट नंबरचा नकाशा ओपन होईल.

११) तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

१२) एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.

१३) सेव करा या बटनावर क्लिक करून तुम्ही नकाशा डाउनलोड करून ठेऊ शकता.

मोफत जमीन मोजणी कशी करायची?

शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi हे मोबाईल अँप इन्स्टॉल कौन घ्यायचे आहे. यांनतर नाव, मो. नं. आदी माहिती भरून हॅलो कृषी अँपवर रजिस्ट्रेशन करायचे आहे. आता होमस्क्रीनवर तुम्हाला जमीन मोजणी नावाचा विभाग दिसेल. यावर क्लिक केल्यांनतर सॅटेलाईटच्या मदतीने शेतकरी आपल्या जमिनीची मोजणी करू शकतो. याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी “शेतजमिनीची मोजणी आता 1 रुपयाही न भरता होणार; आजच घ्या ‘या’ खास सुविधेचा लाभ” हि बातमी वाचा.

error: Content is protected !!