Biological Pest Control : अशाप्रकारे करा जैविक कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । पिकावरील रोगांच्या अथवा किडींच्या नियंत्रणासाठी परोपजीवी कीटक, बुरशी, जिवाणू किंवा विषाणू यांचा उपयोग करणे यास जैविक नियंत्रण (Biological Pest Control) असे म्हणतात. कीटकनाशकामुळे माणसाच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यास धोका पोहोचतो. कीटकनाशके सतत वापरल्यामुळे किडींच्या शरीरात कीटकनाशकास प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. त्याचप्रमाणे पिकांना परोपजीवी आणि उपयुक्त असणाऱ्या किडींचा नाश होतो आणि मग पर्यायाने रोग व किडींचे प्रमाण वाढते. वरील सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी जैविक नियंत्रणाचा (Biological Pest Control) उपयोग फायदेशीर ठरतो. आतापर्यंत भाजीपाला पिकांमध्ये बटाट्यावरील पाकोळी, टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी, वांग्यावरील मावा, भेंडीवरील शेंडा आणि फळ पोखरणारी अळी, कोबीवरील चौकोनी ठिपक्यांचा पतंग आणि घेवड्यावरील खोडमाशी यांचा बंदोबस्त जैविक पद्धतीने करता येणे शक्य झाले आहे.

जैविक नियंत्रणाची उपयुक्तता पटली असली तरी या तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यावर काही मर्यादा येतात. उदाहरणार्थ, जैविक नियंत्रणासाठी वापरण्यात येणारे सर्व परोपजीवी कीटक प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात वाढविता येत नाहीत. काही परोपजीवी कीटकांची संहारक कीड शोधून काढण्याची क्षमता कमी असते. किडींना रोग आणणाऱ्या बुरशी किंवा विषाणू यांची निर्मिती अजूनही मोठ्या प्रमाणात करता येत नाही. बऱ्याच वेळा परोपजीवी किडींचा वापर करून एखाद्या भागातील संहारक किडींचा बंदोबस्त केल्यानंतर परोपजीवी किडींना त्यांच्या उपजीविकेसाठी भक्ष्य न मिळाल्याने परोपजीवी किडी कालांतराने मरतात.

एकात्मिक कीड व्यवस्थापन ( इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट) – Biological Pest Control

पिकावरील रोग किंवा किडींचा बंदोबस्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व उपायांचा समन्वय आणि समतोल साधून एकत्रितपणे पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण करणे याला एकात्मिक पीक संरक्षण योजना असे म्हणतात. यामध्ये

(1) रोग आणि किडी प्रतिबंधक जाती निर्माण करून आणि त्यांचा लागवडीसाठी वापर करून रोगांची किंवा किडींची तीव्रता कमी करणे, (Biological Pest Control)
(2) पिकांची फेरपालट करणे,
(3) पिकांमध्ये स्वच्छता राखणे,
(4) जैविक नियंत्रणाचा वापर करणे, (5) रासायनिक औषधांचा मर्यादित परंतु योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर करणे,
(6) किडींचा उपसर्ग होईल अशा औषधांचा वापर टाळणे,
(7) पिकांची बिगर हंगामी लागवड न करणे,
(8) रोगग्रस्त अथवा कीडग्रस्त झाडे किंवा झाडांचा भाग यांचा त्वरित नायनाट करणे, आणि
(9) मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करणे, इत्यादी बाबींचा समावेश होतो.

एकात्मिक पीक संरक्षण योजनेमुळे खालील फायदे होतात

(1) अधिक प्रभावी आणि स्वस्त पीक संरक्षण साधता येते.
(2) निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते.
(3) किडी किंवा रोगांत कीड-रोगनाशकांना प्रतिकारशक्ती सावकाश निर्माण होते.
(4) शिफारस केलेल्या हंगामातच पिकांची लागवड केल्यामुळे बिगरहंगामी रोगांचा आणि किडींचा उपद्रव टाळला जातो.
(5) वेगवेगळ्या कुळांतील भाजीपाला पिकांचे मिश्रपीक घेतल्याने किडींचा उपद्रव कमी होण्यास मदत होते.

error: Content is protected !!