Black Mango : ऐकावं ते नवलच ! ‘या’ काळ्या आंब्याला बाजारात जोरदार मागणी; काय आहे नेमकं कारण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Black Mango) : राज्यात आणि देशात अनेक फळांचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळा म्हटलं की या ऋतूत आंब्याला अधिक मागणी पहायला मिळते. मात्र यंदा आंब्याचे उत्पादनच कमी झाल्याने बाजरात आंबा कमी आहे. आपल्याला पायरी, देवगड हापूस, रत्नागिरी, केशर असे आंबे माहिती असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका आंब्याबाबत सांगणार आहोत ज्याबद्दल तुम्ही पूर्वी क्वचित ऐकलं असेल. काळ्या रंगाच्या या आंब्याला सध्या बाजारात मोठी मागणी होत असून दरही खूप चांगला मिळत आहे.

बाजारात भाव खात असलेल्या या काळ्या आंब्याने लोकांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ज्या व्यक्तीने या आंब्याची चव चाखून पहिली आहे त्या व्यक्तीला या आंब्याबाबत अधिकाधिक आकर्षण वाटत आहे. या आंब्याला बाजारात ब्लॅक मँगो म्हणतात. मात्र याचे पूर्ण नाव ब्लॅक मँगो स्टोन असे आहे. या आंब्याची लागवड ही साधारणपणे साध्या आंब्यासारखीच केली जाते.

या आंब्याचा रंग काळा असल्याने त्या आंब्याची रोपं, पाने ही काळीच असतात. पण सामान्य आंब्याप्रमाणे त्याची पाने रुंद आणि लांब असतात. या वनस्पतीची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे कारण त्यावर रोग आणि कीटक होण्याची शक्यता असते, ज्यामुळे संपूर्ण झाड नष्ट होते. यामुळे आंब्याचे उत्पादन खंडित होऊ शकते.

काळया आंब्याच्या झाडाला आंबे कधी येतात?

काळ्या आंब्याच्या झाडाला आंबे येण्यासाठी ५ ते ६ वर्षे लागतात. परंतु या आंब्याच्या काही जाती आहेत त्याला १ ते २ वर्षात फळे येतात. एका झाडापासून सुमारे १५ कीलोचे आंबे येतात. जर या काळ्या आंब्यांची रोपं हवी असल्यास बाजारातून सहज उपलब्ध होतात. तसेच बाजारातून घेणं शक्य होत नसेल तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे विकत घेऊ शकता

error: Content is protected !!