Budget 2023 : शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा; कोणत्या विभागाला किती रुपयांचा निधीची तरतूद?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2023) आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यावेळी शिंदे फडणवीस सरकारने शेती क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. यावेळी फडणवीस यांनी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये पीक विमासाठी आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. पीक विम्याची इतर रक्कम सरकार भरणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

  • शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
  • महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
  • भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
  • रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
  • पर्यावरणपूरक विकास
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणार
  • शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ६ हजार रूपयांमध्ये आणखी ६ रूपयांची वाढ राज्य सरकारकडून केली जाणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांकडून वर्षाकाठी १२ हजार रूपये मिळतील.
  • शेतकऱ्यांच्या विम्याचा हफ्ता सरकार भरणार असल्याची मोठी घोषणा फडणवीसांनी केली. यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक रूपया भरावा लागणार असून शासनातर्फे यावर ३३१२ कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता
12,000 रुपयांचा सन्माननिधी

  • प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
  • प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
  • केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
  • 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
  • 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
  • या योजनेचा १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार
  • एकात्मिक पीक आधारित आराखडा तयार करणार
  • नमो शेतकरी महासन्मान योजना फडणवीसांकडून जाहीर झाली आहे.
  • येत्या तीन वर्षात सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जाणार
  • बुलढाण्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र
  • शेतकऱ्यांच्या नुकसानीचे इ-पंचनामे होणार
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपयांची मदत

हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. यासोबत तुम्हाला Ripar प्रमाणे इतर कोणतीही शेती उपयोगी उपकरणे अतिशय कमी किंमतीत विकत घ्यायचे असतील तर Hello Krushi अँप मोबाईल वर इंस्टॉल करून तुम्ही थेट Manufacturer कडून ते विकत घेऊ शकता. तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. रोजचा बाजारभाव इथे समजतो. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्या माध्यमातून करता येते.

  • शेततळे योजनेचा विस्तार करणार
  • गोपीनाथ मुंडे अपघात योजना सुरू करणार
  • अपघातग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची मदत
  • सेंद्रीय शेतीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद
  • बुलढाण्यात संत्रा प्रकल्प प्रक्रियेसाठी ३० कोटींची तरतूद
  • काजू प्रक्रिया उद्योगासाठी १ हजार ३५४ कोटींचं अनुदान
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रतीहेक्टरी १५ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
  • जलयुक्त शिवार भाग २ ची योजना फडणवीसांकडून जाहीर
  • मच्छिमारांसाठी ५ लाखांचा विम्याची घोषणा

  • मागेल त्याला ठिबक सिंचन आणि शेततळे योजना
  • पश्चिम वाहिनी नद्यांना पूर्वेकडे वळवण्यासाठी भरघोस निधीची तरतूद
  • नदीजोड प्रकल्पासाठी शासनाचा निधी देणार
  • कोकणातील सिंचनासाठी विशेष योजना
  • मेंढी पालकांच्या महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतूद
  • ३० टक्के कृषीवाहिन्यांचे सौर उर्जीकरण करणार

  • मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी पाठपुरावा करणार
  • मराठवाड्यासाठी घर घर जल योजना राबवणार
  • मराठवाड्यातील दुष्काळ मिटवण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद
  • पुढील वर्षात २७ जल प्रकल्प पूर्ण करणार
  • तापी खोऱ्यातील पाणी पातळी महापुनर्भरण प्रकल्पावर लक्ष देणार
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/601547368547325
error: Content is protected !!