CIBIL Score : शेतकऱ्यांचं सिबिल स्केअर रद्द होणार? मुख्यमंत्री शिंदेनी दिली महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Cibil Score) : राज्यात शेती व्यवसायासाठी शेतकऱ्यांना काही वेळा कर्ज (Loan) काढावं लागतं. हेच कर्ज काढण्यासाठी बँका (Bank) शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर ( Cibil Score) आकारतात. परंतु आता शेतकऱ्यांना कर्ज मिळावं आणि शेतकरी, सहकार, कष्टकरी यांच्या विकासासाठी राज्य शासन मदत करत असून बँकांनी देखील या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावं. तसेच शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जासाठी मिळणारं सिबिल स्कोअर रद्द करावा. असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“अवकाळी पाउस आणि नैसर्गिक आपत्ती तसेच हवामानातील बदलामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाच्या गरजा आता बँकिंग प्रणालीतून पूर्ण केल्या जाणार आहेत. याची काळजी घेतल्यास तो स्वतःच्या पायावर उभा राहिल. यामुळे आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात येणार नाही.” असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच त्यांनी ‘नमो शेतकरी महासन्मान’ ( Namo Shetkari Mahasanman Scheme) योजनेचा देखील उल्लेख केला आहे. Cibil Score

शासकीय अनुदान मिळवण्यासाठी हे काम करा

शेतकरी मित्रांनो शासकीय अनुदानासाठी तुम्ही सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. यानंतर आपला मोबाईल क्रमांक, वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी भरावी आणि निशुल्क स्वरुपात रजिस्टेशन करा. यानंतर आपल्याला आवश्यक असलेल्या योजनेचे नाव सर्च करून त्या योजनेचा लाभ आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने Hello Krushi या ॲपद्वारे घेता येऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांनी केले नाबार्डचे कौतुक

जलयुक्त शिवार योजना ही गेल्या ९ महिन्यात २७ सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. वाढत्या हवामानाला जुळवून घेणे तसेच प्रतिकूलता कमी करणे यासाठी नाबार्ड उपक्रम राबवत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केलं आहे.

error: Content is protected !!