हॅलो कृषी आॅनलाईन : कापूस उत्पादक (Cotton Production) शेतकरी कापसाच्या दरांबाबत उदासीन आहेत. मागील अनेक दिवसांपासून कापूस बाजारभाव (Cotton Rate) जैसे थे असल्याने शेतकर्यांचा हिरमूड झाला आहे. कापसाचे बाजारभाव वाढतील या आशेवर अनेकांनी आपला कापूस घरी साठवून ठेवला आहे. मात्र कापसाचे दर वाढण्याचे नाव घेत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी आहे.
असे चेक करा तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील आजचे भाव
शेतकरी मित्रांनो आता कोणत्याही शेतमालाचा बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणार्या मोबाईल अॅपने शेतकर्याला स्वत: बाजारभाव चेक करण्याची सुविधा पूरवली आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अॅप इन्स्टाॅल करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या App च्या मदतीने रोजचा बाजारभाव चेक करु शकता. तसेच आपल्या शेतजमिनीचा सातबारा उतारा, जामिनीचा नकाशा आदी कागदपत्रही सोप्यापद्धतीने डाऊनलोड करु शकता. यासोबत शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदीविक्रीही इथून करता येते. तेव्हा आजच Hello Krushi डाऊनलोड करुन या सेवेचे लाभार्थी बना.
आज राज्यात कापसाला सर्वसाधारणपणे 8 हजार रुपये क्लिंटल असा बाजारभाव मिळाला. यामध्ये अकोला शेती उत्पन्न बाजारसमितीत कापसाला राज्यात सर्वांत जास्त 8 हजार 402 रुपये भाव मिळाला. तसेच सिंदी येथे कापसाला 8 हजार 400 रुपये भाव मिळाला.
आज दिवसभरात राज्यात कापसाची मोठी आवक जावक झाली. यामध्ये राज्यात सर्वाधिक कापसाची आवक हिंगणघाट शेती उत्पन्न बाजारसमितीत नोंद झाली. हिंगणघाट येथे आज 6017 क्विंटल इतकी कापसाची आवक झाली. यावेळी कमीत कमी 8000 रुपये अन् जास्तित जास्त 8330 रुपये बाजारभाव मिळाला.
शेतमाल : कापूस (Cotton Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
27/01/2023 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 4600 | 8000 | 8100 | 8050 |
नवापूर | — | क्विंटल | 1 | 7300 | 7300 | 7300 |
भद्रावती | — | क्विंटल | 180 | 7600 | 8150 | 7875 |
समुद्रपूर | — | क्विंटल | 1415 | 7950 | 8200 | 8100 |
हिंगणा | एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 15 | 7900 | 8050 | 8050 |
आष्टी (वर्धा) | ए.के.एच. ४ – लांब स्टेपल | क्विंटल | 106 | 7900 | 8100 | 8000 |
आर्वी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 1205 | 8100 | 8200 | 8150 |
अकोला (बोरगावमंजू) | लोकल | क्विंटल | 125 | 3300 | 8505 | 8402 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 500 | 7400 | 8100 | 8075 |
काटोल | लोकल | क्विंटल | 95 | 8000 | 8150 | 8050 |
कोर्पना | लोकल | क्विंटल | 2316 | 7600 | 7900 | 7750 |
सिंदी | लांब स्टेपल | क्विंटल | 61 | 7800 | 8150 | 7950 |
सिंदी(सेलू) | लांब स्टेपल | क्विंटल | 1500 | 8200 | 8490 | 8400 |
परभणी | मध्यम स्टेपल | क्विंटल | 290 | 8000 | 8195 | 8100 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 6017 | 8000 | 8330 | 8160 |
वर्धा | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1380 | 8010 | 8250 | 8150 |