Cotton Rate : आज राज्यात कापसाला कोणत्या जिल्ह्यात किती रुपये भाव मिळाला? चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Rate : कापूस हे विदर्भ, मराठवाड्यातील एक प्रमुख नगदी पीक आहे. कापसाला मागील वर्षी जवळपास ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र यंदा हाच दर कमी होऊन केवळ ८००० रुपयांवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आज दिवसभरात राज्यात कापसाला सर्वसाधारणपणे आठ हजार रुपये असा दर मिळाला आहे.

आज दिवसभरात राज्यात कापसाची बऱ्यापैकी आवक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी परभणी शेती उत्पन्न बाजारसमितीत मध्यम स्टेपल कापसाला राज्यात सर्वाधिक बाजारभाव मिळाला. परभणी येथे कमीत कमी ७६०० रुपये तर जास्तीत जातीस ८२५० रुपये इतका भाव मिळाला आहे. तसेच सावनेर येथे कापसाची सर्वाधिक आवक झाल्याचे पाहायला मिळाले. सावनेर येथे आज दिवसभरात ४६०० क्विंटल कापसाची आवक झाली.

असा मिळावा घरी बसून राज्यातील हव्या त्या बाजारसमितीचा रोजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरी बसून राज्यातील हव्या त्या बाजारसमितीचा रोजचा बाजारभाव मिळवू शकता. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअरवरील अँपमुळे आता ताजे बाजारभाव मोबाईलवर मिळणे अगदी सोपे झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची दलालांकडून होणारी फसवणूक थांबते अन जिथे अधिक भाव मिळतोय असा बाजारात आपला शेतमाल पाठवण्यास शेतकऱ्याला मदत होते. तेव्हा आजच Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून या सेवेचे लाभार्थी बना.

कापसाला कमी बाजारभाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरामध्येच साठवून ठेवला आहे. कापसाचे दर वाढतील या आशेवर शेतकरी आहेत. कापड उद्योग व्यवसायांनासुद्धा कापसाची कमतरता भासत आहे. मात्र कापसाचे दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/01/2023
सावनेरक्विंटल4600800081008050
किनवटक्विंटल72750076007550
राळेगावक्विंटल3600790081908100
राजूराक्विंटल80770081808140
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल900807581008085
देउळगाव राजालोकलक्विंटल1000750080807900
वरोरालोकलक्विंटल1093700082508000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल461760082008000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल429790082258000
काटोललोकलक्विंटल100790081008050
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल285760082508150
यावलमध्यम स्टेपलक्विंटल97744079807640
error: Content is protected !!