Cotton Rate : कापसाच्या दरात तेजी? तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीप्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या कमी दराने नाराजी होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये कापसाचे दर वाढताना दिसत आहेत. आज राज्यात कापसाला सर्वाधिक ८६०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

आज दिवसभरात झालेल्या उलाढालीमध्ये राळेगाव येथे कापसाची सर्वात जास्त ४६५० क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी ८१०० व जास्तीत जास्त ८४०० रुपये इतका बाजारभाव कापसाला मिळाला. तर सेलू येथे राज्यातील सर्वाधिक ८६०० रुपये बाजारभाव मिळाला आहे. मानवत, राजुरा, आष्टी, सावनेर, अकोला येथे सर्वसाधारण ८४०० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

असा तुम्ही स्वतः चेक करा तुमच्या गावाजवळील बाजारसमितींचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आजवर आपण बाजारभावासाठी बातमीची वाट पाहत आलो आहोत. मात्र आता तुम्ही स्वतः राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव स्वतः चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करावं लागेल. इथे बाजारभावासोबत, सातबारा, नकाशा, जमीन मोजणी आदी सेवाही देण्यात आल्या आहेत. आजच याचा लाभ घ्या.

कापसाचे भाव आणखीन वाढणार?

येणाऱ्या काही दिवसांमध्ये कापसाचे भाव अजून वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्याप आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही. तसेच कापड उद्योगांमध्येसुद्धा कापसाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडी प्रतीक्षा केली तर नक्कीच कापसाचे दर वाढतील.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/01/2023
संगमनेरक्विंटल10750082007850
सावनेरक्विंटल4400820084008325
मनवतक्विंटल3000770086358475
सेलुक्विंटल728740586558600
किनवटक्विंटल49805082008150
राळेगावक्विंटल4650810084008300
राजूराक्विंटल105835084308400
भद्रावतीक्विंटल137820083508275
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल115810084508350
घणसावंगीए.के.एच. ४ – मध्यम स्टेपलक्विंटल98760084008300
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1346810085208350
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल824830083508325
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल124840086538550
देउळगाव राजालोकलक्विंटल600750085308300
वरोरालोकलक्विंटल1349800084008300
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल713800084108200
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल297827583508300
काटोललोकलक्विंटल0800083508250
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1100843085408500
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4412815084858260
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल780805084058200
यावलमध्यम स्टेपलक्विंटल1716745078507580
error: Content is protected !!