Crop Management : पिकांवर कीडरोग होण्याचे प्रमाण हरितक्रांतीमुळे वाढले? कीड नियंत्रणाचे महत्व अन प्रकार जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Crop Management : शेतीव्यवसायामध्ये पिकोत्पादन हा महत्त्वाचा भाग आहे. हरितक्रांतीच्या अगोदर जे पारंपरिक, देशी अथवा इतर स्थानिक पिकांचे वाण वापरले जायचे, ते वेगवेगळया किडींना मोठ्या प्रमाणात प्रतिकारक्षम होते, त्यामुळे केव्हातरी किडींचा प्रादुर्भाव झालाच तर फारसे नुकसान होत नसे. सन 1965 नंतर हरितक्रांतीमुळे निरनिराळ्या पिकांचे जे नवीन वाण विकसित केले गेले, त्यांचा मुख्य उद्देश जास्त उत्पादन घेणे असा होता. त्यामुळे असे वाण किडींना कितपत प्रतिकारक्षम होते याची पुरेशी चाचणी घेतली गेली नाही.

कालांतराने या सुधारित / संकरित वाणांवर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला. ठरावीक मर्यादेपर्यंत जर पिकांचे आर्थिक नुकसान होत नसेल तर अशा किडींचा प्रादुर्भाव दुर्लक्षित केला तरी चालतो, परंतु आर्थिक मर्यादेच्या वर जर जास्त नुकसान होणार असेल तर शेतकन्यांना त्या किडींचा बंदोबस्त करणे अनिवार्य ठरते. सर्वसाधारणपणे बऱ्याच अहवालांमधून असे लक्षात येते की किडींपासून प्रतिवर्षी 5 ते 30% नुकसान होते. त्यामुळे हे नुकसान कमी करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे.

किडींचे नियंत्रण प्रामुख्याने दोन प्रकारे करता येते .
(अ) नैसर्गिक नियंत्रण,
(ब) इतर प्रकारांनी नियंत्रण.

(अ) नैसर्गिक नियंत्रण –

नैसर्गिक नियंत्रण हे निसर्गनियमानुसार होत असते. हवामान, जलाशय, पर्वत व किडीवर उपजिविका करणारे इतर कीटक आदी घटकांमुळे किडींची संख्या बऱ्याच अंशी मर्यादीत ठेवली जाते, आणि नैसर्गिक समतोल राखला जातो.

(आ) इतर प्रकारांनी नियंत्रण –

(1) रायायनिक निरनिराळी औषधे / कीडनाशके फवारून किडींचे नियंत्रण, उदाहरणार्थ, कार्बारिल मँलेथिऑन, एण्डोसल्फान, मोनोक्रोटोफॉस, इत्यादी.
(2) यांत्रिक/ भौतिक यंत्राच्या साहाय्याने किडींचा बंदोबस्त करणे. उदाहरणार्थ, मोठा आवाज निर्माण करून किडी उडविणे, सापळा (फिशोमिन) लावून पकडणे, दिव्याच्या प्रकाशात आकर्षित करून पकडणे, इत्यादी.
(3) मशागतीय शेतीच्या निरनिराळ्या मशागतीने. उदाहरणार्थ, नांगरट, वखरणी, इत्यादी मार्गे नियंत्रण करणे.
(4) जैविक जैविक नियंत्रण ही पर्यावरणावर अनिष्ट परिणाम न होऊ देणारी कायमस्वरूपी कीडनियंत्रणाची उत्कृष्ट पद्धत आहे. किडींचे परोपजीवी अथवा परभक्ष्यी किंवा अन्य प्राणी आणि रोगजंतूंचा वापर करून किडींचा बंदोबस्त म्हणजे जैविक नियंत्रण होय. उदाहरणार्थ, रायकोकार्ड हे जैविक खोडकिडा, बोंडअळी, फुले पोखरणाच्या अळीसाठी स्पिनोसँड हे केसाळ अळीसाठी; एन. पी. व्ही. हरभऱ्यांवरील घाटेअळीसाठी; कोपिडोसोमा हे बटाटा पोखरणाऱ्या अळीसाठी, इत्यादी अनेक उदाहरणे देता येतील.

error: Content is protected !!