Crop Management : पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा अंदाज; ऊस, हरभरा, तूर, भुईमूग पिकांची काळजी कशी घ्यावी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । मराठवाडा विभागामध्ये जालना व बीड जिल्हयात दिनांक 29 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हयात ‍दिनांक 27 व 28 जानेवारी दरम्यान तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 29 जानेवारी रोजी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. (Crop Management) वातावरणातील बदलांमुळे शेतीमधील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याकरता हरभरा, करडई, हळद, तूर, भुईमूग, ऊस, तीळ या पिकांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत तज्ज्ञांनी अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. ‍मराठवाडा विभागामध्ये जालना व बीड जिल्हयात दिनांक 29 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हयात ‍दिनांक 27 व 28 जानेवारी दरम्यान तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 29 जानेवारी रोजी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हे तंत्रज्ञान वापरून हायटेक शेतीतून शेतीमधील उत्पन्न करा दुप्पट

शेतकरी मित्रांनो आता शेतीमधील उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे खूप गरजेचे आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप वापरून १ लाख शेतकरी सध्या हायटेक शेती करून अधिक नफा कमवत आहेत. तुम्हीही या शेती उपयोगी मोबाईल अँप च्या मदतीने प्रगतशील शेतकरी बनून शेतीला व्यावसायिक दृष्टीकोन देऊन मोठा नफा कमावू शकता. आजच तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला रोज कृषी तज्ज्ञांचा मोफत सल्ला मिळतो. तसेच तुमच्या जवळील सर्व खात दुकानदारांशी तुम्ही या अँपच्या मदतीने संपर्क करून खाते Online मागवू शकता. शिवाय तुमचा शेतमाल अँपवर विक्रीसाठी पोस्ट करून थेट बांधावर शेतमालाची विक्री करू शकता. यासोबत रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज इथे दिला जातो. तेव्हा आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचा लाभ घ्या.

मराठवाडयात दिनांक 27 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहून तूरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर दिनांक 03 ते 09 फेब्रूवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीती ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 ते 07 फेब्रुवारी 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन (Crop Management)

राज्यात सध्या ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच राज्यातील काही भागात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज सांगण्यात आला असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. वातावरणातील बदलांमुळे शेतीमधील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याकरता हरभरा, करडई, हळद, तूर, भुईमूग, ऊस, तीळ या पिकांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत तज्ज्ञांनी अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे. खाली आम्ही पिकानुसार पीक व्यवस्थापन सल्ला दिला आहे.

हरभरा पीक व्यवस्थापन

  • हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
  • हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.
  • हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करडई पीक व्यवस्थापन

  • करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
  • करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद पीक व्यवस्थापन

  • हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते.
  • काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.
  • तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या हळद पिकाची सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

तूर पीक व्यवस्थापन

  • तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता उशीरा लागवड केलेल्या काढणी/मळणी केलेल्या तूर पिकाची सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

भुईमूग पीक व्यवस्थापन

  • तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या रब्बी भुईमूग पिकाची सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

ऊस पीक व्यवस्थापन

  • ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
  • ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड 15 फेब्रुवारी पर्यंत करता येते.

तीळ पीक व्यवस्थापन

  • उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी एकेटी-101, एकेटी-103, जेएलटी-408, एकेटी-64, एनटी-11-91 या वाणांपैकी वाणाची निवड करावी.
  • उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दूसऱ्या आठवड्या पर्यंत करता येते.
error: Content is protected !!