तुरीच्या ओळीमध्ये घेतले गांजाचे आंतरपीक, 168 गांजाच्या झाडासह 91,728 रुपयाचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली प्रतिनिधी । रमाकांत पोले

राज्यात वरचेवर गांजाची शेती केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. हिंगोली जिल्ह्यात एका शेतकऱ्याने तुरीच्या ओळीमध्ये गांजाचे आंतरपीक घेतल्याचे समजताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये 168 गांजाच्या झाडासह 91,728 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याचा शोध घेऊन कार्यवाही करीत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वसमत उपविभागात अवैध व्यवसायाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की; मौजे मुडी येथील इसम नामे धुराजी उर्फ राजू शेषराव पडोळे वय 35 राहणार मुडी याने स्वतःच्या तुरीच्या पिकामध्ये गांजाचे अंतर पीक घेतले आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेत चे सपनि शिवसांब घेवारे व त्यांचे पथक मौजे मुडी शेतशिवारातील गट क्रमांक 125 मध्ये जाऊन पंचासह छापा मारला असता सदर शेतामध्ये तुरीच्या ओळीमध्ये गांजाचे लहान-मोठे 168 झाडे /रोपे मिळून आली. सदर गांजाचे झाडे चे एकूण वजन 3.822 किलोग्रॅम किमती अंदाजे 91 हजार 728 रुपयेचे मिळून आले.

सदर गांजाचे रोपे लावणारा आरोपी धुराजी उर्फ राजू शेषराव पडोळे रा मुडी यांच्या विरोध पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक श्री पंडित कच्छवे स्थागुशा, पोनि चंद्रशेखर कदम वसमत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोउपनि यामावार, पोलीस अंमलदार उपरे, गणेश लेकुळे, आकाश टापरे ,नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे, भांगे, मपोह गिरी, तसेच नायब तहसीलदार श्री विलास तेलंग, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, तलाठी प्रवीण पांडे, कृषी सहाय्यक शेख अब्दुल रझाक यांच्या पथकाने केली आहे.

error: Content is protected !!