‘या’ खतासोबत सेल्फी काढून शेतकरी जिंकू शकतो Rs. 2,500; मोदी सरकारकडून मिळणार पारितोषिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । नॅनो युरिया (Nano Urea) हे नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेले एक अतिशय फायदेशीर खत आहे. सामान्य युरियाप्रमाणेच काम करणारे हे खत जमिनीला दूषित करत नसल्याने सरकारकडून या खताच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. युरिया खत जमिनीवर टाकल्याने जमिनीचा पोत खराब होतो. तसेच लागणारे खताचे प्रमाणही जास्त असते. मात्र याऐवजी शेतकऱ्यांनी जर नॅनो युरियाचा वापर केला तर कमी मात्रा खत वापरून शेतकऱ्याला अधिक फायदा मिळवणे शक्य होते. यामुळे पैसे, वेळ तर वाचतोच परंतु जमिनीचे नुकसानही टाळता येते.

केंद्र सरकार सध्या नॅनो युरियाचा शेतकऱ्यांनी वापर करावा म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने नॅनो खत वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही जर शेतात नॅनो युरिया वापरून शेतकऱ्यांसोबत सेल्फी क्लिक केला तर यावर मोदी सरकार 2500 रुपयांचे पारितोषिक देणार आहे. शेतकऱ्यांनी सामान्य युरिया ऐवजी नॅनो युरियाचाच वापर करावा यासाठी सरकार अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत आहे.

सरकारी अनुदान मिळवणे आता झाले अगदी सोपे

शेतकरी मित्रांनो सरकारी अनुदान मिळवणे आता अतिशय सोपे झाले आहे. आता शेतकरी हव्या त्या सरकारी योजनेला घरी बसून मोबाईलवरून अर्ज करू शकतो. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करायचे आहे. इथे सरकारच्या सर्व योजनांची माहिती शेतकऱयांना देण्यात येते. तसेच यासोबत रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज शेतकरी स्वतः चेक करू शकतो. शिवाय आपला सातबारा उतारा, भूनकाशा, डिजिटल सातबारा अशी सर्व कागदपत्रे Hello Krushi अँपवरून अगदी सहज डाउनलोड करून घेता येतात. जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री अशा शेती उपयोगी सेवांचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप इन्स्टॉल करून घ्या.

अर्ज कसा करायचा

तुम्हीही शेतकरी असाल आणि तुमच्या पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी नॅनो युरिया वापरत असाल तर शेतात जाऊन नॅनो युरिया लिक्विड खतासह सेल्फी क्लिक करा. तसेच आपण नॅनो युरियाची फवारणी करताना किंवा कृषी सेवा केंद्रातही Nano Urea सोबत सेल्फी काढून तो अपलोड करू शकता. कोणताही सामान्य नागरिक शेतात जाऊन शेतकऱ्यासोबत सेल्फी घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही static.mygov.in वर क्लिक करू शकता.

किती रुपयांचे बक्षीस मिळेल

नॅनो यूरियासह शेतकरी सेल्फी स्पर्धेसाठी २५१ लोकांनी अर्ज केले आहेत. सर्व प्रथम www.mygov.in वर क्लिक करा. येथे मार्गदर्शक सूचनांनुसार मोबाईल क्रमांकाने लॉग इन करून सेल्फी अपलोड करावा लागेल. यावेळी सहभागीने त्याच्या राज्याचे नाव लिहिणे आवश्यक आहे. तुम्ही या स्पर्धेत 14 फेब्रुवारीपर्यंत सहभागी होऊ शकता.

  • प्रथम पारितोषिक विजेत्यास 2,500 रुपयांचे रोख बक्षीस
  • द्वितीय पारितोषिक विजेत्यास रोख 1,500 रुपये
  • तृतीय पारितोषिक विजेत्यास रु.1,000 चे रोख पारितोषिक
  • याशिवाय 5 सहभागींना 500-500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

नॅनो युरिया वापरताना काय काळजी घ्यावी? फायदे जाणून घ्या

माहितीपटासाठी 20,000 रोख पारितोषिक

नॅनो युरिया सेल्फी स्पर्धेप्रमाणे नॅनो युरिया माहितीपट स्पर्धाही ठेवण्यात आली आहे. या अंतर्गत MyGov आणि रसायने आणि खते मंत्रालयाने नॅनो युरिया वापरणाऱ्या शेतकऱ्यांवर एक डॉक्युमेंटरी शूट करायची आहे आणि ती www.mygov.in वर अपलोड करायची आहे. शेतकऱ्यांमध्ये नॅनो यूरियाबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी शासनाने याचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही static.mygov.in ला भेट देऊ शकता. या स्पर्धेतील विजेत्यास प्रथम पारितोषिक म्हणून 20,000 रुपये, द्वितीय पारितोषिक म्हणून 10,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक म्हणून 5,000 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

PDF – www.hellokrushi.com

error: Content is protected !!