Agriculture News : Rs 20,000 लिटरने बाजारात विकलं जातंय ‘या’ फुलाचं तेल; लागवड केली तर महिना 1 लाख कमाई?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये अलीकडे अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत आहेत. कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणाऱ्या काही पिकांची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुगंधू फुलाच्या शेतीबाबत माहिती सांगणार आहोत. सध्या बाजारात या फुलाचे तेल २० हजार रुपये किलो या दराने विकलं जात आहे. शेतकऱ्याने याची लागवड केली तर महिना १ लाख कमवता येऊ शकतात असं बोललं जात आहे. मात्र यात किती तथ्य आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Geranium Cultivation

जिरॅनियम शेती विषयी शेतकऱ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा होत आहे. या फुलाला परदेशी बाजारात अधिक मागणी असून त्यापासून ब्युटी प्रॉडक्ट्स, स्प्रे आणि औषध बनवले जाते असे सांगण्यात येते. जिरेनियमची लागवड करून नंतर त्याची कापणी केल्यास पुढील ४ वर्षे उत्पादन चालू राहत असल्याने शेतकऱ्यांना हे कमी त्रासाचं पीक वाटत आहे. महाराष्ट्रात अगदी नाशिक पासून कोल्हापूर पर्यंत अन मराठवाडा, विदर्भातही याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील बंडायु, कासगंज आणि संभल जिल्ह्यातील शेतकरी तांबडी किंवा पांढरी फुले येणारे जिरॅनियम फुलझाड लागवड करतात. मध्य प्रदेशात शरबती गहू पिकवणारे शेतकरी आता त्यांच्या जमिनीच्या काही अंशीभागात तांबडी किंवा पांढरी फुले येणाऱ्या फुलझाडाची लागवड करून नफा कमवत आहेत. जिरेनियमसाठी कमी आर्द्रता, सौम्य हवामान असलेले ठिकाण अधिक योग्य असून अशा भागात याचे चांगले उत्पादन मिळते.

जर तुम्हालाही जिरॅनियम लागवड करायची असेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या अँप वरून तुमच्या जवळच्या रोपवाटिकांची माहिती मिळवू शकता. त्यापैकी चांगली रोपे कमी किंमतीत देणाऱ्या रोपवाटिकेमधून जिरॅनियम रोपे विकत घेऊन हॅलो कृषी अँप मधील पीक माहिती मध्ये सर्व पिकांची लागवड पद्धत सांगितली आहे त्याप्रमाणे लागवड करू शकता. या पिकाची लागवड करायची असल्यास तुम्हाला एक लाख रुपये खर्च करता येईल. तुम्हाला हवे असल्यास फळबाग योजनांच्या अनुदानाचा लाभ घेऊन शेतीचा खर्चही कमी करता येईल.

अनेकांचा जिरॅनियम शेतीचा अनुभव मात्र वाईट आहे

शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्ध जिरॅनियम शेती करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला त्याचे मार्केट १०० टक्के उपलब्ध होणार आहे का ते चेक करा. कारण अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी जिरॅनियम लागवड केली, जिरेनियमला दरही चांगला मिळत होता, पण त्यांचे तेल विकत घेण्यासाठी कोणतीच कंपनी समोर आली नाही. परिणामी त्या शेतकऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला. तेव्हा अशा आयुर्वेदिक फुलझाडांची लागवड करताना प्रथम मार्केटची खात्री करा, केवळ दर चांगला आह एम्ह्णून कोणाचेही ऐकून लगेच लागवड करण्याचा निर्णय घेऊ नका.

error: Content is protected !!