शासन निर्णय (GR) : पशुखाद्याच्या विक्रीबाबत महाराष्ट्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय! ‘या’ उत्पादकांना बाजारात विक्री करता येणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : पशुपालन व दुध उत्पादन व्यवसायामध्ये पशुखाद्याची गुणवत्ता ही अतिशय महत्वाची बाब आहे. उत्पादित दुधाचे प्रमाण व त्याची गुणवत्ता, त्याचप्रमाणे पशुंचे आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमता ही पशुखाद्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. पशुखाद्याची गुणवत्ता ही पशुपालन व दुग्धव्यवसायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. फुड्स सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्डस् ऑफ इंडिया या संस्थेने त्यांच्या दि.१७.१२.२०१९ आणि. दि. २७.०१.२०२० रोजीच्या पत्रातील निर्देशाप्रमाणे पशुखाद्याची उत्पादन व विक्री ही आयएसआय मार्क (बीआयएस प्रमाणकाप्रमाणे) असणे बंधनकारक केले आहे.

काय आहे शासन निर्णय?

फुड्स सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्डस् ऑफ इंडिया या संस्थेने त्यांच्या दि. १७.१२.२०१९ आणि दि. २७.०१.२०२० रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार राज्यात आयएसआय मार्क (बीआयएस प्रमाणकाप्रमाणे) पशुखाद्याचे उत्पादन व विक्री करणे बंधनकारक आहे. भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस) परवानाधारक पशुखाद्य उत्पादक संस्थांनीही भारतीय मानक संस्थेच्या प्रमाणकाप्रमाणेच पशुखाद्याचे उत्पादन करावे आणि पशुखाद्याच्या पॅकिंग बॅगवर पशुखाद्यातील अनघटकाचे प्रमाण (उकू. क्रुड प्रोटीन, कुड फैट, क्रुड फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, अॅश, मॉइश्वर, इत्यादी) ठळकपणे नमुद करणे बंधनकारक आहे.

त्याचप्रमाणे अन्नघटकाच्या प्रमाणकासोबत पॅकिंग बॅगवर खालील बाबीही ठळकपणे नमुद कराव्यात.

अ) उत्पादन संस्थेचे नाव व पत्ता
आ) उत्पादक परवाना क्रमांक
इ) पशुखाद्य उत्पादनाचा दिनांक व बेंच क्रमांक
ई) सदर उत्पादन वापरण्याचा अंतिम दिनांक (बेस्ट बिफोर यूज)
(उ) निव्वळ वजन (नेट बेट )
ऊ) विपनण (मार्केटिंग) कंपनीचे नाव व पत्ता

राज्यातील पशुखाद्य उत्पादक संस्थांचे पशुखाद्य फुड्स सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्डस् अॅक्ट २००६, भारतीय मानक कायदा आणि ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ मधील तरतुदीनुसार भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस) प्रमाणका इतके असणे आवश्यक आहे. ज्या पशुखाद्य उत्पादकांनी BIS खाली नोंदणी केली नसेल अशा पशुखाद्य उत्पादकांना सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीमध्ये भारतीय मानक संस्थेचा (बीआयएस) परवाना घेण्याची कार्यवाही करावी. अन्यथा, अशा पशुखाद्य उत्पादकांना त्यांच्याकडे उत्पादित होणाऱ्या पशुखाद्याची बाजारात विक्री करता येणार नाही.

प्रत्येक पशुखाद्य उत्पादक संस्थानी, सदर उत्पादन संस्था ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहे त्या तालुक्याचे सनियंत्रण करणाऱ्या सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांच्या उपस्थितीमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्वप्रकार निहाय पशुखाद्याचे यादृच्छिकपणे (रेंडमली नमुने घेवून सदर पशुखाद्य नमुन्यांची शासन मान्यता प्राप्त सक्षम प्रयोगशाळेकडून नियमितपणे तपासणी करावी. सदर तपासणी अहवालानुसार मानकाप्रमाणे पशुखाद्य उत्पादनः न करणाऱ्या उत्पादकांचे अहवाल पशुसंवर्धन विभागाने कायद्याने प्राधिकृत केलेल्या यंत्रणेस पुढील कायदेशीर कारवाई करीता सादर करावेत.

error: Content is protected !!