Gram Ujala Yojana : ग्रामीण भागात 1 कोटी LED बल्बचे वाटप; केंद्र सरकारच्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्र सरकार सातत्याने ग्रामीण भागासाठी नवनवीन योजना जारी करत असते. कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारने मागील काही वर्षांत अनेक नवीन योजना सुरु केल्या आहेत. ग्रामीण भागात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात असून यासाठी सरकारने ग्राम उजाला योजना (Gram Ujala Yojana) लागू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना LED बल्बचे वाटप करण्यात येत आहे. नुकतेच शासनाने तब्बल १ कोटी बल्बचे वाटप केले असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे.

सरकार ग्रामीण विकासासाठी अनेक मोठी पावले उचलत आहे. भारतातील प्रत्येक गावात सर्व सुविधा पोहोचवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारद्वारे ग्राम उजाला योजना चालवली जात आहे. याचा उद्देश ग्रामीण भारतातील प्रत्येक घरात प्रकाश पोहोचवणे हा आहे. कृषी मंत्री तोमर यांनी ट्विट करून या योजनेद्वारे गावकऱ्यांना एकूण 1 कोटी एलईडी बल्बचे वाटप करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

आजच असा करा सरकारी योजनेसाठी अर्ज

शेतकरी मित्रांनो आता कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळवणे अतिशय सोपे झाले आहे. तुम्ही घरी बसून हातातील मोबाइलवरूनच हव्या त्या सरकारी योजनेला अर्ज करून लाभ मिळवू शकता. यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. या अँप वर शेतकरी सर्व सरकारी योजनांना अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो. तसेच रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज स्वतः चेक करू शकतो. याबरोबर सातबारा उतारा, नकाश आदी कागदपत्र सहज डाउनलोड करण्याची सुविधाहि Hello Krushi अँपवर आहे. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करून शासकीय योजनांचा लाभ मिळवा.

विशेष बाब म्हणजे सरकारकडून प्रत्येक एलईडी बल्ब केवळ 10 रुपये दराने दिला जात आहे. आतापर्यंत बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात LED बल्बचे वाटप पूर्ण झाले आहे.

ग्राम उजाला योजना

केंद्र सरकारने ग्रामीण भारतातील प्रत्येक घरात एलईडी बल्ब उपलब्ध करून देण्यासाठी ग्राम उजाला योजना सुरू केली आहे. कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (CESL) च्या माध्यमातून खेड्यांतील प्रत्येक घरात फक्त 10 रुपयांमध्ये LED बल्ब वितरित करण्यासाठी हि योजना राबवण्यात येत आहे. शिवाय या योजनेंतर्गत जुन्या बल्बऐवजी सरकार 3 वर्षांच्या गॅरंटीसह 7 ते 12 वॅट्सचे नवीन एलईडी बल्ब अवघ्या 10 रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहे. योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त 5 बल्ब दिले जात आहेत.

LED बल्बच्या वापराने विजेची बचत

अनेकदा खेड्यात लोक 60 ते 100 वॅटचे बल्ब लावत असतात. पण आता त्याची जागा 5 ते 12 वॅटच्या एलईडी बल्बने घेतली आहे. म्हणजेच एलईडी बल्ब इतर बल्बच्या तुलनेत 8 पट कमी वीज वापरतो. त्यामुळे आकडेवारीवर नजर टाकली तर एलईडी बल्बच्या वितरणामुळे दरवर्षी सुमारे ७२ कोटी वीज युनिट्सचा वापर कमी होत आहे. त्यामुळे 250 कोटी रुपयांच्या बजेटची बचत होत आहे.

error: Content is protected !!