Havaman Andaj : राज्यात आज दिवसभरासह पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे. मागील सप्टेंबर महिन्यात पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. आता परतीचा पाऊस तरी व्यवस्थित होतो कि नाही अशी भीती अनेकांना लागून राहिली होती. मात्र परतीचा पाऊस सुरु झाला असून महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस?
हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या ताज्या सॅटेलाईट फोटोनुसार कोकण गोव्याच्या किनार्यावरील अरबी समुद्रावरील दबाव, रात्रभर आवक होऊन रत्नागिरी आणि गोवा ओलांडण्याची शक्यता आहे, परिणामी 48 तासांत प्रदेशात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबत मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे.