हवामान अंदाज : पुढील 72 तास महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्याला रेड अलर्ट कि ओरँज?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हवामान अंदाज : राज्यात दोन दिवसांपासुन पावसाने थैमान घातले आहे. नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात २५ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार तर मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

तिमुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ८० जणांना वाचवण्यात आले आहे. दरम्यान १०० हून अधिक लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरफ, एसडीआरएफ, टीडीआरफची पथके घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाली आहेत. हे गाव खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी डोंगरात आहे. आपत्ती निवारण यंत्रणा पोहोचली असली तरीही सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

राजधानी दिल्लीत यमुना नदी आजही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागात सकाळपासून पाऊस सुरू असून राज्यात २२ जुलैपर्यंत सततच्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. देशात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, तेलंगणा आणि ओडिशा राज्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर तर राजस्थान, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात आणि ओडिशा लगतच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

राज्याच्या विविध भागांत अलर्ट

  • या जिल्ह्यांत रेड अलर्ट: भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
  • या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट : पुणे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा.
  • या जिल्ह्यांत यलो अलर्ट: नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला.
error: Content is protected !!